जॉनी डेप आणि अ‍ॅम्बर हर्डच्या घटस्फोटावर कायद्याची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 05:52 PM2017-01-15T17:52:29+5:302017-01-15T17:52:29+5:30

गेल्या वर्षी प्रचंड गाजलेले जॉनी डेप आणि अ‍ॅम्बर हर्डचे घटस्फोट प्रकरण आता अधिकृतरीत्या पूर्णत्वास गेले आहे. मे महिन्यात जॉनी ...

Law enforcement on Johnnie Depp and Amber Hurd's divorce | जॉनी डेप आणि अ‍ॅम्बर हर्डच्या घटस्फोटावर कायद्याची मोहोर

जॉनी डेप आणि अ‍ॅम्बर हर्डच्या घटस्फोटावर कायद्याची मोहोर

googlenewsNext
ल्या वर्षी प्रचंड गाजलेले जॉनी डेप आणि अ‍ॅम्बर हर्डचे घटस्फोट प्रकरण आता अधिकृतरीत्या पूर्णत्वास गेले आहे. मे महिन्यात जॉनी डेपपासून वेगळे होण्यासाठी अ‍ॅम्बरने घटस्फोटाचे पेपर्स दाखल केले होते. अलिकडे झालेल्या सुनवणीमध्ये न्यायाधीशाने या पेपर्सवर सही करून त्यांना अंतिम स्वरुप दिले.

अ‍ॅम्बरच्या वकीलाने यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘आमच्यासाठी हा दिवस फार चांगला ठरला. अ‍ॅम्बरला लवकरात लवकर जॉनी डेपपासून घटस्फोट हवा होता. न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब करून तिच्या मनातील एकमेव इच्छा पूर्ण केली. तिच्या आयुष्यातील एक काळे प्रकरण आता कायमचे मिटले असेच म्हणावे लागेल.’

जॉनी आणि अ‍ॅम्बरची भेट ‘द रम डायरी’ या चित्रपटाच्यावेळी भेट झाली होती. शूटींग दरम्यान त्यांच्यामध्ये वाढणारी सलगी मीडियामध्ये चर्चेचा विषय बनला होता. दोघांच्या वयातील अंतर पाहता या जोडीविषयी अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. दीर्घकाळाची प्रेयसी वेनेसाला सोडून जॉनीने अ‍ॅम्बरशी संसार थाटण्याचा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला.

तेव्हापासूनच हे लग्न टिकणे अशक्य आहे, असे म्हटले जाऊ लागले. सुरुवातीचा प्रेमाचा बहर ओसरल्यानंतर मात्र दोघांमध्ये ‘आॅल इज वेल’ नसल्याची मीडियाला कुणकुण लागली होती. ते सतत भांडत असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सुत्रांनी दिली होती. लवकरच ते एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचीही बातमी आली होती.

अखेर मे महिन्यात सर्वांच्या मनातील शंका खरी ठरवत अ‍ॅम्बरने जॉनीपासून वेगळे होत असल्याचे जाहीर केले. त्याच्यावर तिने अनेक आरोप केले. जॉनी आपल्याला कसा त्रास द्यायचा याचे तिने तर पाढेच वाचून दाखवले. अशा माणसाच्या चित्रपटांवर आपण सर्वांनी बहिष्कार टाकला पाहिजे इतपत तिने म्हटले होते.

Web Title: Law enforcement on Johnnie Depp and Amber Hurd's divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.