Kim Kardashian made herself self-polar! | किम कर्दाशियनने स्वत:च केली स्वत:ची पोलखोल!

रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार किम कर्दाशियन वेस्ट नेहमीच तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. परंतु यावेळेस तिने तिच्या विषयीचे असे काही रहस्य उलगडले ज्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल चर्चा करण्याची जणूकाही संधीच चालून आली आहे. होय, किमला असे वाटते की, ती खूप स्वार्थी आहे. पीपुल्स डॉट कॉम या वेबसाइटनुसार, किपिंग अप विद द कर्दाशियनसच्या एका एपिसोडदरम्यान, किमने शो बघणाºया एका ट्विटर युजर्सच्या प्रश्नाचे उत्तर देताना हे वक्तव्य केले. किमचे हे वक्तव्य स्वत:ची पोलखोल करणारे ठरले आहे. ट्विटर युजरने लिहिले होते की, कोण स्वार्थी आहे मी की किम कर्दाशियन?

किमने युजरच्या या प्रश्नाचे उत्तर देताना लिहिले होते की, नाही, तुम्ही तसे नाहीत तर मीच स्वार्थी आहे. तुमच्यात मला तसे काहीही दिसत नाही, उलट मी पूर्णपणे स्वार्थी असल्याचे दिसून येते. किमच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. तिच्या चाहत्यांमध्ये तर किम स्वार्थी असल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. वास्तविक आपले हॉट फोटो शेअर करण्यासाठी ओळखल्या जाणाºया किमचा हा खुलासा तिचे एक रहस्य उलगडणारा ठरला. दरम्यान, किम नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसाठी हॉट फोटो शेअर करीत असते. तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतो. या अगोदर किमने ३५२ शब्दांचे तिचे कॉफी टेबल बुक रिलीज केले होते. ज्याचे शीर्षक ‘सेलफिश’ असे होते. 
Web Title: Kim Kardashian made herself self-polar!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.