Kim Kardashian loves these two things !! | किम कर्दाशियांला भारतीयांच्या या दोन गोष्टी आवडतात!!

टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार किम कर्दाशियां हिने भारताबद्दल प्रेम व्यक्त करताना भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या वेशभूषा आणि आभूषणांचे आकर्षण असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर किपिंग अप विद द कर्दाशियांस हा शो घेऊन ती भारतात येण्याची अपेक्षा ठेवून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किमने मीरा जॅकबच्या माध्यमांतून वॉग इंडियाच्या मार्च महिन्यातील अंकात भारताप्रती तिच्या मनात असलेल्या प्रेमाचा खुलासा केला. तिने म्हटले की, ‘साड्या, आभूषणे, कपडे खूप सुंदर आहेत. मी माझ्या शोच्या आयोजकांना भारतात जाण्यासंदर्भात सांगितले आहे.’

पुढे बोलताना किमने म्हटले, मी नेहमीच असा विचार करीत आले की, मी केवळ माझ्या परिधान संग्रहापर्यंत मर्यादित राहणार नाही. शिवाय मी असाही विचार केला नव्हता की, मी कधी स्टार बनणार. मला असेही वाटत होते की, माझा हा शो एक किंवा दोन सीजनपर्यंतच सुरू राहणार. जेव्हा माझ्या या शोला यश मिळत गेले तेव्हा माझी आई क्रिेस जेनर खूपच आनंदी आणि उत्साहित होती. वास्तविक आम्हाला हेदेखील माहिती नव्हते की, आम्ही काय सुरू करत आहोत. वास्तविक सुरुवातीच्या काळात आम्ही नक्कीच काही चुका केल्या, परंतु यामुळे मला माझा एक सौंदर्य ब्रॅण्ड लॉन्च करण्यास मदत झाली. 

असो, किमला तिच्या हॉट लूकसाठी ओळखले जाते. ती नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. बºयाचदा तिला तिच्या या फोटोंमुळे ट्रोलही केले जाते. किमचे जगभरात चाहते आहेत. भारतातही तिचे बरेचसे चाहते असून, किम भारतात आल्यास तिच्या चाहत्यांसाठी हा एक उत्तम योग असेल. 
Web Title: Kim Kardashian loves these two things !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.