Kim Kardashian Expectations; 'Give Me Respect'! | किम कर्दाशियांची अपेक्षा; ‘लोकांनी माझा आदर करावा’!

‘बदनाम हुए तो क्या नाम न होगा’ याप्रमाणेच रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार किम कर्दाशियांची गत झाली आहे. आपल्या बोल्ड आणि मादक शरीराचे नेहमीच प्रदर्शन करणारी किम कर्दाशिया सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेमुळेच जगभरात प्रसिद्ध झाली आहे. मग ते तिचे बोल्ड फोटो असो वा लीक झालेला व्हिडीओ असो यामुळे किम क्षणार्धात जगात पोहोचली. वास्तविक किमला घरबसल्या प्रसिद्धाचा हव्यास असल्याने ती आपल्या शरीराचा कसा वापर करेल, याचा काही नेम नाही. आता हेच बघा ना, काही दिवसांपूर्वीच तिने चक्क झाडावर चढून न्यूड फोटोशूट केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अनेकांनी तिच्या या फोटोचे कौतुक केले, तर काहींनी तिच्यावर जोरदार टीकाही केली. परंतु ‘प्रसिद्धी’ हा एकमेव ध्यास असलेल्या किमवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. परंतु आता तिचे हृदय परिवर्तन होताना दिसत आहे. तिला असे वाटत आहे की, लोकांनी तिचा आदर करायला हवा. एक चांगली व्यक्ती म्हणून लोकांनी तिच्याकडे बघायला हवे. परंतु हे घडू शकते काय? हा मात्र अनुत्तरीत प्रश्नच म्हणावा लागेल. 

फिमेलफर्स्ट डॉट को डॉट युके या वेबसाइटने दिलेल्या माहितीच्या हवाल्यानुसार आयएएनएसने सांगितले की, ‘टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा असतानाही ३६ वर्षीय किम कर्दाशियाला वाटते की, तिच्या जीवनातील लक्ष्य अद्यापपर्यंत साध्य झालेले नाही. एक चांगली व्यक्ती म्हणून लोकांनी तिच्याकडे बघावे असे तिला वाटते. याविषयी बोलताना किमने म्हटले की, ‘माझी अपेक्षा आहे की, मला नेहमीच एक चांगली व्यक्ती म्हणून लोकांनी स्मरण करावे. लोकांनी मला पसंत करावे मात्र त्याचबरोबर माझा आदरही करावा. लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्यानंतर मनात अशाप्रकारचे विचार येणे स्वाभाविक असल्याचेही किम म्हणाली. 
 

मात्र, किमने ज्यापद्धतीने आपल्या बोल्ड अ‍ॅटीट्यूडने जगभरात ओळख निर्माण केली त्यावरून लोक तिला ही इमेज सोडून तिला अपेक्षित असलेल्या इमेजमध्ये पसंत करतील काय? हा मोठा प्रश्न आहे. वास्तविक कर्दाशिया परिवाराच त्यांच्या बोल्डनेससाठी ओळखला जातो. किमसह तिच्या तिन्ही बहिणींनी आपल्या मादक शरीराने जगात ओळख निर्माण केली. या बहिणींच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे. परंतु या चाहत्यांच्या मनात अन् हृदयात कर्दाशिया बहिणींची ओळख बोल्डनेसमुळेच आहे, हेही तेवढेच खरे आहे. अशात किमची अपेक्षा तिचे चाहते पूर्ण करतीय काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 
Web Title: Kim Kardashian Expectations; 'Give Me Respect'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.