Justin Bieber's 'habit' will surprise you !! | जस्टिन बीबरची ‘ही’ सवय तुम्हाला आश्चर्यचकित करेल!!
जस्टिन बीबरची ‘ही’ सवय तुम्हाला आश्चर्यचकित करेल!!
गायक जस्टिन बीबर नेहमीच त्याच्या गर्लफ्रेण्ड्समुळे चर्चेत असतो; मात्र यावेळेस तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. खरं तर हे कारण ऐकून तुम्हाला त्यावर विश्वासच बसणार नाही. परंतु आम्ही तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की, हे खरं आहे. कारण जस्टिन लक्झरियस हॉटेलमध्ये स्वत:चे कपडे स्वत:च धूत असतो. 

वेबसाइट एसशोबीज डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, बीबर मोंटाज ब्रेवर्ली हिल्स हॉटेलमध्ये राहत असतो. या ठिकाणी तो नियमितपणे बाल्कनीत कपडे सुकविण्यासाठी येत असल्याचे बघावयास मिळाले आहे. काही फोटोंमध्ये जस्टिन बीबरचा टी-शर्ट स्टील रॅकवर अडकलेला दिसत आहे. सूत्रानुसार बीबर स्वत:च्या हिमतीवर त्याच्या स्वप्नातील घर खरेदी करू इच्छितो. याकरिता त्याची शोधमोहीम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. 

बीबर या महिन्याच्या दहा तारखेला भारत दौºयावर येत असून, मुंबई येथील डी. वाय. पाटील मैदानावर त्याची लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार असून, सध्या या शोची तिकीट विक्री जोरदार सुरू आहे. आतापर्यंत तिकीट विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याने देशभरातील बीबरचे फॅन्स मुंबईत येण्याची शक्यता आहे. 

या कॉन्सर्टमध्ये सुरुवातीला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा परफॉर्मन्स करणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर मात्र सोनाक्षी परफॉर्मन्स करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले; मात्र सोनाक्षी व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड सेलेब्स या कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार असल्याने फॅन्ससाठी ही कॉन्सर्ट पर्वणी ठरण्याची शक्यता आहे. 
Web Title: Justin Bieber's 'habit' will surprise you !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.