Justin Biber has been penalized for this' cause! | जस्टिन बीबरला ‘या’ कारणामुळे ठोठावला दंड!

ड्रायव्हिंग करताना सेलफोन वापरल्याप्रकरणी गायक जस्टिन बीबर याला दंड ठोठावण्यात आला आहे. टीएमझेड डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी जेव्हा जस्टिन त्याची काळ्या रंगाची मर्सीडीज जी-वेगन चालवित होता, तेव्हा एका पोलीस अधिकाºयाने त्याला रोखले. कारण जस्टिन सेलफोनचा वापर करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर अधिकाºयाने जस्टिनला दंड ठोठावला. 

सूत्रानुसार, बीबरने पोलिसांशी कुठल्याही प्रकारची हुज्जत घातली नाही. एरवी नेहमीच वाद करण्यास सज्ज असलेला बीबर यावेळी मात्र खूपच शांत असल्याचे दिसत होता. त्याने पोलिसांशी कुठल्याही प्रकारची हुज्जत घातली नाही. संबंधित अधिकाºयाने ठोठावलेला दंड त्याने लगेचच भरला. कदाचित जस्टीनने केलेल्या चुकीची त्याला उपरती झाली असावे, असेच म्हणावे लागेल. 


अमेरिकेत वाहन चालविताना जर तुम्ही सेलफोनचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले तर तुम्हाला १६२ डॉलर (जवळपास १० हजार ४२५ रुपये) दंड आकारला जातो. त्यानुसार जस्टिनला दंड आकारण्यात आला. बीबरने त्याची ‘पर्पस वर्ल्ड टूर’च्या युरोपीय दौरा पूर्ण केल्यानंतर तो काहीकाळ सुट्या एन्जॉय करीत आहे. त्यानंतर तो पुन्हा आॅस्ट्रेलियाला रवाना होणार असून, नंतर अमेरिकेत परतणार आहे. 

बीबर त्याच्या टूरच्या दुसºया टप्प्यात २९ जुलै रोजी उत्तर अमेरिकेच्या दौºयावर जाणार आहे. दरम्यान, जस्टिनची भारतात आयोजित करण्यात आलेली कॉन्सर्ट बºयाच अर्थाने वादग्रस्त ठरली होती. कारण त्याच्या कॉन्सर्टनंतर चाहत्यांचा हिरमोड केल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. 
Web Title: Justin Biber has been penalized for this' cause!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.