Jennifer Lawrence's 'Red Sparrow' Trailer Release! | जेनिफर लॉरेंसच्या ‘रेड स्पॅरो’चा ट्रेलर रिलीज!

अभिनेत्री जेनिफर लॉरेंस हिच्या आगामी ‘रेड स्पॅरो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात जेनिफर लॉरेंस लीड रोलमध्ये आहे. ‘हंगर गेम्स’मध्ये तुफान अ‍ॅक्शन दाखविल्यानंतर जेनिफर पुन्हा एकदा अशाच काहीशा खंतरनाक अंदाजात या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची कथा खूपच मनोरंजक आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, सध्या तो जबरदस्त व्हायरल होत आहे. ‘रेड स्पॅरो’ हा चित्रपट जस्टिन हेथ यांच्या ‘रेड स्पॅरो’ या कांदबरीवर आधारित आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटाला फ्रान्सिस लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केले आहे. 

चित्रपटात जेनिफर व्यतिरिक्त जोएल एडगरटन, मिथयास शूनेर्ट्स, जेरेमी आयरन्स, मॅरी लुईस पार्कर आणि शार्लट रॅम्पलिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. जेनिफरचा हा चित्रपट होळीला म्हणजेच २ मार्च रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग हंगेरी, स्लोव्हाकिया, व्हिएन्ना आणि लंडन याठिकाणी करण्यात आली आहे. जेनिफरने चित्रपटात डबल एजंटची भूमिका साकारली आहे. ती रूसी स्पाय एजंट असून, तिची सीआयएच्या एजंटबरोबर लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. २७ वर्षीय जेनिफरने ‘एक्स मॅन सीरिज, हंगर गेम्स सीरिज’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘...’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगिरीत आॅस्कर पुरस्कार मिळविला आहे. त्याचबरोबर जेनिफर या ‘...’ या चित्रपटावरही काम करीत आहे. 
Web Title: Jennifer Lawrence's 'Red Sparrow' Trailer Release!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.