Jaane owner and GG Hadid's breakup! | जायन मालिक आणि जीजी हदीदचे झाले ब्रेकअप!

इंटरनॅशनल गायक जायन मालिक आणि त्याची गर्लफ्रेंड जीजी हदीद यांच्यात ब्रेकअप झाले आहे. जायन आणि जीजीने नोव्हेंबर २०१५ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. आता आपल्या रिलेशनशिपच्या दोन वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जायनने ब्रेकअपची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना ट्विटरवर लिहिले की, ‘मी माझ्या चाहत्यांचा आभारी आहे की, त्यांनी माझ्या या निर्णयाचे व आमच्या प्रायवेसीचा सन्मान केला. वास्तविक आम्हाला ही बातमी तुम्हालाच सर्वात अगोदर सांगायची होती.’ या पोस्टमध्ये जायनने जीजीचे कौतुकही केले. तसेच ती अडमायर करते, असेही म्हटले. जीजीनेदेखील तिच्या ट्विटरवर लिहिले की, अपेक्षा करते की, जायनला आपल्या आयुष्यात सर्वात चांगल्या गोष्टी मिळाल्या असतील. मी एक मैत्रीण म्हणून त्याला पुढच्या काळातही सपोर्ट करणार आहे. कारण आजही माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. दरम्यान, जायन आणि जीजी त्यांच्यातील नात्यामुळे नेहमीच चर्चेत राहायचे. जीजी एक अमेरिकन मॉडेल आहे तर जायन एक गायक आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा सातत्याने त्यांच्यातील नात्याची सोशल मीडियावर चर्चा रंगायची. दोघांनी नेहमीच एकत्र राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु जेव्हा दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली तेव्हा त्यांचे चाहते खूपच निराश झाले. दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे, अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले. अनेकांनी तर तुमच्यात खूप चांगला समजूतदारपणा आहे. अशात तुम्ही विभक्त होणे आम्हाला निराश करणारे आहे. तुम्ही पुन्हा एकत्र यायला हवे, असे ट्विट केले. 
Web Title: Jaane owner and GG Hadid's breakup!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.