'I am the only one in the private jet, and it was a double bed', the actress spoke on sex scandal! | ‘प्रायव्हेट जेटमध्ये फक्त मी, तो आणि डबल बेड होता’, सेक्स स्कॅण्डलवर बोलली ही अभिनेत्री!

आॅस्कर विनर हॉलिवूड अभिनेत्री नतालिया पोर्टमॅन हीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेक्स स्कॅण्डलवर बिनधास्त प्रतिक्रिया दिली. तिने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींबरोबर होत असलेल्या सेक्स स्कॅण्डल आणि सेक्शुअल हरॅशमेंटवर अनेक खळबळजनक खुलासे केले. यावेळी तिने स्वत:सोबत घडलेल्या एका घटनेचाही उलगडा केला. तिने म्हटले की, एका हॉलिवूड निर्मात्याने तिला त्याच्या प्रायव्हेट जेट प्लेनमध्ये प्रवास करण्याची आॅफर दिली होती. त्यावेळी माझ्याकडे त्यांना नकार देण्याचे काहीही कारण नव्हते. परंतु जेव्हा मी त्याच्या जेट प्लेनमध्ये गेली तेव्हा मला याची जाणीव झाली की, त्याठिकाणी केवळ मी, तो, जेट प्लेनमध्ये एक मोठे बेड आणि श्वास गुदमरून टाकणारे वातावरण होते. तेथून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ झाला होता, असेही नतालियाने सांगितले. 

पुढे बोलताना नतालिया म्हणाली की, ‘त्यावेळी मी असा विचार करीत होती की, प्रवाशांनी भरलेल्या फ्लाइटमध्ये प्रवास करण्यास मला का सांगितले गेले नाही? कारण त्या प्लेनमध्ये केवळ आम्ही दोघे आणि एक मोठे बेड होते.’ मात्र त्यादिवशी नतालियाचे नशीब बलवत्तर असल्याने तिच्यासोबत काहीही अघटित घडले नाही. नतालियाने म्हटले की, संबंधित निर्मात्याने जेव्हा मला त्या गोष्टीसाठी विचारले तेव्हा मी त्याला नकार दिला. त्यामुळे ही कथा पुढे न जाता तेथेच संपली. नतालियाचा हा किस्सा हॉलिवूडमधून समोर येत असलेल्या प्रकरणांशी मिळताजुळता आहे. 

२०१० मध्ये ‘ब्लॅक स्वान’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आॅस्कर पुरस्कार जिंकणाºया नतालियाने सांगितले की, ‘मी या घटनेकडे फार गांभीर्याने बघत नव्हते. परंतु काही काळानंतर मला याची जाणीव झाली की, मीदेखील सेक्शुअल हरॅशमेंटला बळी पडले आहे. ही आठवण खूपच त्रासदायक असून, इंडस्ट्रीमध्ये असे प्रकार आजही घडत असल्याचेही नतालियाने सांगितले. 
Web Title: 'I am the only one in the private jet, and it was a double bed', the actress spoke on sex scandal!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.