साय या नावाने प्र्रसिद्ध असलेली कॅनडाची हॉलिवूड अभिनेत्री शेनन एशले मिशेल नुकतीच जोधपूर शहर फिरून गेली आहे. विशेष म्हणजे ती जोधपूरला आली याची येथील लोकांना भनकही लागली नाही. सायने जेव्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर करीत तिच्या जोधपूर टूरची माहिती दिली तेव्हा ती जोधपूरला येऊन गेल्याचे समोर आले. ब्ल्यू सिटीच्या प्रेमात पडलेल्या सायने लिहिले की, ‘या ठिकाणी आल्यानंतर तिला एखाद्या प्रिंसेसप्रमाणे वाटले. छोट्या-छोट्या गल्लींमध्ये आॅटोने प्रवास करणे खूपच रोमांचक होते. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही.’

दरम्यान, सायने तिच्या जोधपूर टूरदरम्यान शहरातील अतिशय छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये आॅटोची सैर केली. आॅटो प्रवासाच्या अनुभवाबद्दल सायने लिहिले की, ‘ब्ल्यू सिटीतील गर्दीने खचाखच भरलेल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जर तुम्ही आॅटोने प्रवास केला तर तुम्ही रोलर कोस्टर आणि स्काय ड्राइव्हचा रोमांच विसरून जाल. 

शहरात भटकंती करण्यासाठी आॅटो ही माझ्या पसंतीची स्वारी राहिली असल्याचेही तिने सांगितले. जोधपूर या प्राचीन शहरातील एका मकानासमोर उभी असलेला फोटो शेअर करताना सायने लिहिले की, ‘वेल वेटच्या या गाउनमध्ये मी प्रिंसेस असल्याचे मला वाटत आहे. त्यामुळे माझ्या इतर प्रोगॅमचा विचार बाजूला ठेवल्यास जोधपूर शहरात येण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय राहिला आहे. 

कॅनडामध्ये १० एप्रिल १९८७ मध्ये जन्मलेल्या सायने आपल्यातील अंतर्भूत गुणांनी इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करण्याबरोबरच मॉडलिंग क्षेत्रातही तिने स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याव्यतिरिक्त लेखिका म्हणून ओळख निर्माण केली. तसेच स्वत:चा बिझनेसही सुस्थितीत नेवून ठेवला. टीव्ही शो फ्रिडम सिरीजच्या माध्यमातून तिला विशेष ओळख मिळाली. 

सायने एक मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. बºयाचशा देशांमधील प्रसिद्ध कंपन्यांसाठी तिने मॉडलिंग केली आहे. पुढे अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर ती टोरॅँटोला परतली होती. त्यानंतर तिने टीव्ही शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जमैकाचा रॅपर शीन पॉल याच्या ‘होल्ड माय हॅण्ड’ या म्युझिकल व्हिडीओच्या माध्यमातून तिला संपूर्ण जगभरात ओळख मिळाली. 

२०१५ मध्ये तिने ‘ब्लिस’ नावाचे पुस्तक लिहिले. याव्यतिरिक्त तिने तिचे लाइफस्टाइल चॅनेलही सुरू केले. तसेच यावर्षापासून तिने तिची प्रॉडक्शन कंपनीही सुरू केली. तिला वॉर्नर ब्रदर्सकडून खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. 
Web Title: 'The' Hollywood actress wanders on Jodhpur road; But no one has given her the choice!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.