Hollywood actress Vanessa Marquez stops 'toy gun'! Police shot a real shot !! | हॉलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केजने रोखली ‘टॉय गन’! पोलिसांनी खरोखरचं झाडली गोळी!!
हॉलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केजने रोखली ‘टॉय गन’! पोलिसांनी खरोखरचं झाडली गोळी!!

मेडिकल ड्रामा सिरीज ‘ईआर’ मुळे चर्चेत आलेली हॉलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केज हिला चौकशीसाठी आलेल्या पोलिसांशी नडणे जीवावर बेतले. होय, चौकशीसाठी आलेल्या पोलिसांवर वेनेसाने खेळण्यातील बंदूक रोखली आणि पोलिसांनी ती खरी समजून गोळीबार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
गुरूवारी ही घटना घडल़ी वेनेसाची प्रकृती बरी नव्हती. तिच्या प्रकृतीच्या चिंतेतून घरमालकाने पोलिसांना सूचना केली. यानंतर काहीचं मिनिटांत पोलिस वेनेसाच्या पॅसेडेना येथील निवासस्थानी पोहोचले. पोलिसांना समोर पाहून वेनेसाने हुबेहुब खरी दिसणारी खेळण्यातली बंदूक अर्थात टॉय गन पोलिसांवर रोखली होती. ही बंदूक खरी समजून गोळीबार केला यात तिचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, घर मालकाच्या तक्रारीनंतर पोलिस चौकशीसाठी पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांसोबत एक डॉक्टरही हजर होता. पण वेनेसाने धमकी देण्यासाठी खेळण्याची टॉय गन पोलिसांवर रोखली. त्यामुळे प्रकरण चांगलेच चिघळले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत गोळीबार केला.
लॉस अ‍ॅजेलिस पोलीस अधिकारी लेफ्टिनेट मेंडोजा यांनी सांगितलं की, वेनेसा मानसिक आजाराने ग्रस्त होती. पोलिसांसोबत आलेल्या डॉक्टरांनी तिच्यासोबत दीड तास चर्चा केली होती, पण ती काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती. अचानक तिची मानसिक स्थिती बिघडली आणि तिने पोलिसांवर टॉय गन रोखली होती.


Web Title:  Hollywood actress Vanessa Marquez stops 'toy gun'! Police shot a real shot !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.