Good News: Singer Biyenseni gave birth to twins! | Good News : गायिका बियॉन्सेनी दिला जुळ्या मुलांना जन्म!!

आंतरराष्ट्रीय लोकप्रिय गाायिका बियॉन्से नोल्स हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बियॉन्सेच्या जुळ्या मुलांविषयी तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर १५ जूनच्या आसपास तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. याबाबतची माहिती रोजर फ्रिडमॅनचे मनोरंजन पोर्टल शोबिज ४११ वर देण्यात आली आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वीच बियॉन्सेने प्रेग्नेंट फोटोज् शेअर करून सोशल मीडियावर धूम उडवून दिली होती. त्याचबरोबर बियॉन्से लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर तिच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. मात्र तिने मुलांना जन्म केव्हा दिला याबाबतचा अद्यापपर्यंत खुलासा होऊ शकला नाही. मात्र १५ जूनच्या आसपास तिने मुलांना जन्म दिला असावा असा अंदाज लावला जात आहे. 

न्यू यॉर्क येथे सॉन्गराइर्ट्समध्ये जे जेडला हॉल आॅफ फेमने सन्मानित करण्यात येणार होते. परंतु तो त्याठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळेच तो बियॉन्सेच्या प्रेग्नेसीमुळे हजर राहू शकला नसेल अशी चर्चा रंगल्यानंतर याबाबतची माहिती समोर आली आहे. जशी बियॉन्सेच्या प्रेग्नेंसीविषयी सस्पेंस आहे, तसाच सस्पेंस तिच्या जुळ्या मुलांविषयीदेखील आहे. कारण या मुलांचे लिंग अद्यापपर्यंत समजले नाही. 

माजी अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सॉन्गराइर्ट्स हॉल आॅफ फेममधून एक व्हिडीओ प्रसारित केला असून, त्यात त्यांनी दोन मुलांच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. पीपुल्स डॉट कॉम या वेबसाइटने एका सूत्राचा हवाला देताना सांगितले की, बे आणि जे खूपच आनंदी आहेत. त्यांनी ही गोड बातमी त्यांच्या परिवार आणि मित्रपरिवाराला सांगण्यास सुरुवात केली आहे. 
Web Title: Good News: Singer Biyenseni gave birth to twins!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.