golden globes awards 2019 | लेडी गागा झाली भावूक ! ग्लेन क्लोजने जिंकला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड!!
लेडी गागा झाली भावूक ! ग्लेन क्लोजने जिंकला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड!!

७६ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्ची सुरुवात झालीय. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज ७ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता या अवॉर्डच्या रंगारंग सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यात लेडी गागाने ‘ A Star Is Born ’ या चित्रपटातील  Shallowया गाण्यासाठी ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीत अवॉर्ड जिंकला. यंदा कॅलिफोर्नियामध्ये या सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर लेडी गागा काहीशी भावूक झाली. म्युझिक इंडस्ट्रीत महिलांना फार गंभीरपणे घेतले जात नाही. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, असे ती म्हणाली. अवॉर्ड जिंकल्यानंतरचा तिचा व्हिडिओ तूर्तास सोशल मीडियावर व्हायरल होतोय.डेरेन क्रिसने बेस्ट अ‍ॅक्टर (लिमिटेड सीरिज) द एसेसिनेशन आॅफ जियानी वर्सेस: अमेरिकन क्राईम स्टोरीसाठी आपला पहिला गोल्डन अवॉर्ड जिंकला.
‘द वाईफ’साठी अभिनेत्री ग्लेन क्लोज हिने बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड जिंकला. तर क्रिश्चियन बेलला ‘वाइस’साठी बेस्ट अ‍ॅक्टरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन मोशन पिक्चरच्या कॅटेगरीत ओलिविया कोलमन हिला ‘द फेवरेट’साठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. डेरेने क्रिसने बेस्ट अ‍ॅक्टर (लिमिटेड सीरिज) द असेसिनेशन आॅफ जियानी वर्सेज : अमेरिकेन क्राईम स्टोरीसाठी आपला पहिला ग्लोडन ग्लोब अवॉर्ड जिंकला.
गोल्डन ग्लोब हा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेच्या हॉलिवूड मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची सुरूवात जानेवारी १९४४ मध्ये लॉस एंजेल्स येथे झाली. तेव्हापासून आॅस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब हा चित्रपट सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय पुरस्कार राहिला आहे. 

बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन ए मोशन पिक्चर- म्यूजिकल-कॉमेडी
ओलिविया कोलमैन(द फेवरिट)

बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन ए मोशन पिक्चर-ड्रामा
ग्लेन क्लोज (द वाइफ)

बेस्ट अ‍ॅक्टर इन ए मोशन पिक्चर- म्यूजिकल-कॉमेडी
क्रिश्चियन बेल(वाइस) 

बेस्ट अ‍ॅक्टर इन ए टेलीविजन सीरीज-म्यूजिकल/कॉमेडी
माइकल डगलस (द कोमिनस्कॉय मेथड) 

बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन ए लिमिटेड सीरीज/मोशन पिक्चर मेड फॉर टीवी
पैट्रिसिया आर्क्वेटे(एस्केप ऑफ डैनेमोरा) 

बेस्ट डायरेक्टर- मोशन पिक्चर
अल्फांसो क्यूरों (रोमा) 

English summary :
The 76th Golden Globe Awards 2019 were started. Lady Gaga won the award for Original Song category for the song "Shallow" in the film A Star Is Born. This year the event has been organized in California.


Web Title: golden globes awards 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.