Gallo Gadot to release 'Wonder Woman' in 2019! | गॅल गॅडोटचा ‘वंडर वुमन’ २०१९ मध्ये होणार रिलीज!

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडोटचा ‘वंडर वुमन-२’ हा चित्रपट १३ डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वॉर्नर ब्रदर्सने मंगळवारी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता गॅल गॅडोटचा जलवा बघण्यासाठी २०१९ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वास्तविक वॉर्नर ब्रदर्सने ‘वंडर वुमन-२’च्या अगोदर एका अशाच काहीशा अ‍ॅक्शनपटाची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आता ‘वंडर वुमन-२’च्या रिलीजची घोषणा केल्यामुळे हा चित्रपट रिलीज केला जाणार की नाही, याविषयी साशंकता आहे. दरम्यान, वॉर्नर ब्रदर्सकडून ‘वंडर वुमन-२’च्या निर्मितीला अधिक प्राधान्य दिले जात असल्याने हाच चित्रपट २०१९ पर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला जाण्याची चर्चा आहे. 

यावर्षी रिलीज झालेल्या दिग्दर्शक पॅटी जेनिकंसचा ‘वंडर वुमन’ या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली. अभिनेत्री गॅल गॅडोट हिची भूमिका सर्वच अर्थाने सरस ठरल्यामुळे या सिरीजचा दुसराही भाग यावा, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. त्यानुसार निर्मात्यांकडून आता दुसºया भागावर काम केले जात असून, त्याच्या रिलीजची रीतसर घोषणा करण्यात आली आहे. 

दरम्यान, अभिनेत्री गॅल गॅडोट सध्या तिच्या आगामी ‘जस्टिस लीग’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. ‘वंडर वुमन’मुळे गॅल गॅडोटला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. ती प्रेक्षकांच्या मनात बसली असून, ‘जस्टिस लीग’लाही प्रेक्षक पसंती देतील, अशी तिला अपेक्षा आहे. 
Web Title: Gallo Gadot to release 'Wonder Woman' in 2019!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.