Fill the Hilary Duff trainer | हिलेरी डफ ट्रेनरवर फिदा

अभिनेत्री तथा गायिका हिलेरी डफ हिने गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम देत मान्य केले की, तिचा ट्रेनर जॅसन वॉल्श याला ती डेट करीत आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार डफने गेल्या रविवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत.  
डफने फोटोबरोबर एक लाल रंगाच्या ‘दिल’च्या आकाराची इमोजी देखील पोस्ट केली. तसेच कॅप्शनमध्ये लिहले की, मी जॅसन वॉल्शला पसंत करीत आहे. सध्या आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. डफ आणि वॉल्श गेल्या काही महिन्यांपासून बºयाचशा ठिकाणी एकत्र फिरताना पहावयास मिळाले. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यातच गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमधील सोहोमध्ये दोघेही एकमेकांचा हातात हात घेवून फिरतानाचे काही फोटो व्हायरल झाल्याने त्यांना त्यांच्यातील रिलेशनशिपबाबत विचारले जात होते. परंतू दोघांकडूनही याबाबत खुलासा केला जात नव्हता. 

अखेर हिलेरीने गेल्या रविवारी पोस्ट शेअर करून या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम दिला. जॅसन वॉल्श हा गेल्या काही वर्षांपासून हिलेरीचा पर्सनल ट्रेनर म्हणून काम करीत आहे. याचवेळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असावेत असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान दोघांमधील रिलेशनशिपचा उलगडा झाल्यानंतर आता या चर्चा थांबविल्या जाव्यात अशी अपेक्षा हिलेरीने व्यक्त केली आहे. हिलेरीने दोघांचा फोटो शेअर केल्यानंतर तिच्या फॅन्सच्या काही तासातच या फोटोला तुफान कमेंट आणि लाइक्स मिळाल्या आहेत. काहींनी तिचे अभिनंदनही केले आहे. आता या दोघांमधील हे नाते किती दिवस टिकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 
Web Title: Fill the Hilary Duff trainer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.