The father of the dead singer claims; 'She comes to me as a black bird!' | मृत गायिकेच्या वडिलांचा दावा; ‘ती मला काळ्या पक्ष्याच्या रूपात भूत होऊन भेटायला येते’!

हॉलिवूड गायिका एमी वायनहाउस हिने जगाचा निरोप घेऊन आता सहा वर्र्षे पूर्ण झाले आहेत. परंतु अशातही तिच्या वडिलांनी एक धक्कादायक दावा केला आहे. होय, तिच्या वडिलांच्या मते, मुलगी एमीचा आत्मा त्यांना एका काळ्या रंगाच्या पक्षी आणि भुताच्या रूपात दररोज भेटायला येत असतो. मिच वायनहाउस यांनी काही दिवसांपूर्वी द सनला सांगितले की, त्यांच्या मुलीचा आत्मा केंट स्थित एका घरात त्यांना भेटण्यासाठी येत असतो. ग्रॅमी आणि ब्रिट अवॉर्ड विजेत्या एमीचे निधन २३ जुलै २०११ रोजी झाले होते. २७ वर्षीय एमीचा मृतदेह तिच्या घरी आढळून आला होता. यावेळी तिने मद्यपान केल्याचे समोर आले होते. 

एमीच्या वडिलांच्या मते, मी गेल्या काही वर्षांपासून हा विचार करीत होतो की, माझी मुलगी कुठल्या ना कुठल्या रूपात मला भेटण्यासाठी येणार. त्यामुळे ती मला आता भेटण्यासाठी येत आहे. वास्तविक ती शारीरिक रूपात मला भेटण्यासाठी येत नाही, परंतु आत्मा बनून ती मला भेटण्यासाठी नियमित येत आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ‘तिचा आत्मा येतो अन् माझ्या अंथरूणाच्या कोपºयात येऊन बसतो. ती केवळ त्याठिकाणी बसलेली असते, तिचा सुंदर चेहरा अगदी माझ्या मुलीसारखा आहे. ती मला बघत राहते. मी तिला म्हणतो, ‘तुला काही त्रास तर होत नाही ना? कारण ती जेव्हा त्याठिकाणी बसते तेव्हा मी काहीसा अस्वस्थ होत असतो. परंतु ती माझ्या आजूबाजूला मला समाधानही वाटते. मिचने सांगितले की, जेव्हा तिचा वाढदिवस (१४ सप्टेंबर) असतो, तेव्हा ती माझ्या आजूबाजूलाच असते. ती कधी-कधी काळ्या पक्षाच्या वेशात येत असते. या पक्षाच्या आकाराचा तिने टॅटूही बनविला होता. एमी वायनहाउसचा जन्म १४ सप्टेंबर १९८३ मध्ये एका यहुदी परिवारात झाला होता. संगीताचे बाळकडू तिला तिच्या परिवाराकडूनच मिळाले होते. वायनहाउसचे करिअर २००७ पासून डगमगीत होण्यास सुरुवात झाली. जेव्हा तिचे लग्न निर्माता ब्लेक सिव्हील फिल्डर याच्याशी झाले होते. पुढे २००८ मध्ये तिला फुफ्फुसाचा आजार झाला होता, त्यामुळे डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दात सांगितले होते की, नशा तुझ्यासाठी घातक आहे. तसेच मद्य आणि ड्रग्सपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु अशातही एमी मद्य आणि ड्रग्सच्या आहारी गेली. वास्तविक नशेपासून मुक्ती मिळविण्यासाठी काहीकाळ ती नशामुक्ती केंद्रातही जात होती. परंतु २३ जुलै २०११ मध्ये एमीचा तिच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला. 
Web Title: The father of the dead singer claims; 'She comes to me as a black bird!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.