Embarrassed by the onscreen sex, fear of her bold image | ​ऑनस्क्रीन सेक्स करणाऱ्या एंबर डेविसला वाटायला लागली आहे तिच्या बोल्ड इमेजची भीती
​ऑनस्क्रीन सेक्स करणाऱ्या एंबर डेविसला वाटायला लागली आहे तिच्या बोल्ड इमेजची भीती
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे अनेक कलाकार सध्या बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये आहेत. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एंबर डेविस तर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अधिक चर्चेत असते. तिने नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे तिने चांगलाच वाद ओढवून घेतला आहे. एंबर डेविस ही एक वादग्रस्त अभिनेत्री असून एका मालिकेत ऑनस्क्रीन सेक्स केल्यामुळे ती चर्चेत आली होती. पण या सगळ्यामुळे तिची इमेज खूपच खराब झाली असल्याचे आता तिला वाटू लागले आहे. एवढेच नव्हे तर स्क्रीनवर कोणतेही इंटिमेट दृश्य दिल्यास त्याचा तिच्या इमेजवर परिणाम होत असल्याची जाणीव तिला आता होऊ लागली आहे. 
एंबर डेविस ही केवळ २१ वर्षांची असली तरी ती तिच्या बोल्ड इमेजमुळे ती लहान वयातच चर्चेत आली. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, स्क्रीनवर इंटिमेट दृश्य दिल्यास ती चांगलीच नर्व्हस होते. लव्ह आयलँड या प्रसिद्ध कार्यक्रमाची ती विजेती आहे. या कार्यक्रमात काम करण्याच्या अनुभवाविषयी ती सांगते, लव्ह आयलँडच्या घरात गेल्यावर तुमच्या लक्षात येते की, तिथे तुमच्या आधीच काही लोक राहत असतात. त्या लोकांसोबत राहाणे, त्यांच्यासोबत जमवून घेणे हे खूपच कठीण असते. घरात गेल्यानंतर किमसोबत मला राहायचे होते. त्यामुळे हे सगळे माझ्यासाठी तितकेसे सोपे नव्हते. 
एंबर डेविस ही एक चांगली डान्सर देखील आहे. तिच्या नृत्याचे नेहमीच कौतुक केले जाते. एंबर डेविस तिच्या बोल्ड इमेजमुळे चर्चेत असली तरी या इमेजची तिला आता भीती वाटायला लागली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण एकेकाळी स्क्रीनवर सेक्स केल्यामुळे ती चर्चेत आली होती आणि आता या सगळ्यामुळे तिची इमेज खराब झाली असल्याचे तिला वाटू लागले आहे.
लव्ह आयलँड या कार्यक्रमाची विजेती ठरलेली एंबर डेविसला आता आपली इमेज बदलायची असून त्यासाठी ती प्रयत्न करत आहे असेच तिच्या विधानामुळे म्हणावे लागणार आहे. 
Web Title: Embarrassed by the onscreen sex, fear of her bold image
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.