काय म्हणता?? हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सनने फेसबुकवर वाटले कोट्यवधी रूपये?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 07:08 PM2018-08-09T19:08:08+5:302018-08-09T19:09:28+5:30

फेसबुकवरच्या एखाद्या पोस्टला लाईट, कमेंट वा शेअर करण्याचे पैसे मिळतात, असे तुम्ही कधी ऐकले वा अनुभवले आहे का? पण अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतेय. 

dwayne johnson holding a facebook give money | काय म्हणता?? हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सनने फेसबुकवर वाटले कोट्यवधी रूपये?

काय म्हणता?? हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सनने फेसबुकवर वाटले कोट्यवधी रूपये?

googlenewsNext

फेसबुकवरच्या एखाद्या पोस्टला लाईट, कमेंट वा शेअर करण्याचे पैसे मिळतात, असे तुम्ही कधी ऐकले वा अनुभवले आहे का? पण अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतेय. यात पोस्टला लाईक, कमेंट वा शेअर केल्यास कोट्यवधींचे गिर्फ्ट कार्ड, लग्झरी गाड्या आणि काय काय देण्याचा दावा केला गेलाय. हा दावाही कुण्या सामान्य व्यक्तिने केलेला नाही तर हॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता ड्वेन जॉन्सनने केला आहे.दचकलात ना? पण हे खरे आहे. ड्वेनचा ‘स्काय स्क्रॅपर’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला.


गत २६ जुलैला ड्वेन नामक फेसबुक प्रोफाईलवरून एक पोस्ट केली गेली आहे. यात नोटांच्या बंडलवर एक संदेश लिहिलेला आहे. ‘तुमचा आशीर्वाद येतोय. आमीन टाईप करा आणि शेअर करा’, असा हा संदेश आहे. यानंतर १ आॅगस्ट २०१८ रोजी याच ड्वेन नामक फेसबुक प्रोफाईलवर एक आणखी पोस्ट केली गेली आहे. यात काही लोक गिफ्ट स्वीकारताना दिसत आहेत. ‘आमीऩ़़बक्षिस मिळवणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन आणि आज मी १०० भाग्यशाली लोकांना आशीर्वाद देणार,’ असेही त्याखाली लिहिले आहे.
या प्रोफाईल पोस्टची खातरजमा केली असता, ते बनावट असल्याचे लक्षात आले. म्हणजे, हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनच्या नावाचे प्रोफाईल बनवून या सर्व पोस्ट केल्या गेल्या आहेत. ड्वेनच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर अशी कुठलीही पोस्ट नाही. या फेक अकाऊंटचा आणि पैसे वाटण्याचा उद्देश मात्र कळला नाही.

Web Title: dwayne johnson holding a facebook give money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.