अभिनेत्री तथा रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार केंडर जेनर तिचा ‘हॉलिवूड हिल्स’ हा आलिशान महाल विकत आहे. हे विकण्यामागचे कारण ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, याचवर्षी मार्च महिन्यात जवळपास एक कोटी रुपयांची ज्वेलरी या महालातून चोरीला गेली होती. तेव्हापासून केंडर खूपच त्रस्त आहे. अखेर आता तिने हा महालच विकण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर जेव्हा चोरी झाली होती, तेव्हाच केंडलने याबाबतची रितसर तक्रार केली होती. परंतु पोलीस चोरट्यांचा छडा लावण्यास असमर्थ ठरल्यानेच, वैतागून केंडरने हा महाल विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंडलने हा महाल ४१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. रिपोटर््सनुसार, अद्यापपर्यंत हे स्पष्ट होऊ शकले नाही की, हे घर कोणी आणि किती कोटींमध्ये विकत घेतले आहे. ४,८०० स्क्वेअर फूट परिसरात असलेला हा आलिशान महाल विंटेज स्टाइल आहे. केंडलने हा महाल जॉन क्रासिंस्की आणि एमिली ब्लंट यांच्याकडून जून २०१६ मध्ये खरेदी केला होता. या महालात सहा बेडरूम्स, पाच बाथरूम्स आहेत. महालातील सर्वच रूम वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट केल्या आहेत. प्रत्येक खोलीत वेगवेगळ्या प्रकारचे सोफे आहेत. बहुतांश सोफ्यांचा रंग पांढरा आहे. वुडन फ्लोर आहे, लिव्हिंग रूममध्ये फायर प्लेस आहे. घराच्या कॅम्पसमध्ये खूप मोठा पूल आहे. त्याचबरोबर बसण्यासाठी एक मोठी स्पेशल स्पेस आहे. पुलाजवळ सीटिंग चेअर आणि व्हिंटेज स्टाइल खुर्च्या आणि सोफे आहेत. या आलिशान महालात एक मॉडर्न किचनही आहे, ज्यामध्ये आधुनिक सुविधा आहेत. किंचनमध्ये व्हाइट कॅबिनेट आणि सेंटर टेबल आहेत. त्याचबरोबर किचनमधून बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी एक स्पेशल विंडो आहे. १० सीटर वूड डायनिंग टेबल आहे. डायनिंग टेबलच्या चेअरचा रंग पांढरा आहे. महालाच्या आउट साइड परिसरातही लंच आणि डिनरसाठी एक स्पेशल विंटेज स्टाइल टेबल आहे. एका भव्य रूममध्ये ही व्यवस्था केलेली आहे. 
Web Title: Due to the theft, the actress got a lot of luxury palace to sell!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.