'Deadpool-2' Hindi trailer release; 'The' superstar gave Thanos voice! | ‘डेडपूल-२’चा हिंदी ट्रेलर रिलीज; ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारने दिला ‘थानोस’ला आवाज!

‘डेडपूल-२’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये पुन्हा एकदा तुफान अ‍ॅक्शन अंदाज बघावयास मिळत आहे. बिंधास्त आणि फटकळ स्वभावाचा सुपरहिरो असलेल्या ‘डेडपूल’चे हिंदी डबिंग ‘पद्मावत’च्या अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे रणवीर सिंगने केले आहे. रणवीर सिंगला त्याच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखले जाते. त्यामुळे डेडपूलसारख्या सुपरहिरोला त्याने अतिशय परफेक्ट डबिंग केले आहे. रणवीर सिंग अतिशय मस्तीच्या मूडमध्ये डेडपूलचे डायलॉग बोलताना दिसतो. वास्तविक हॉलिवूडच्या सुपरहिरोंना हिंदी डायलॉगमध्ये बोलताना बघणे प्रेक्षकांसाठी नेहमीच मजेशीर राहिले आहे. ‘डेडपूल-२’मध्ये ‘अ‍ॅवेंजर्स सन्फिनिटी वॉर’चा थानोस बघावयास मिळणार आहे. 

‘डेडपूल’ सीरिजचा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी ठरणार आहे. कारण ‘डेडपूल-२’मध्ये मार्वलचे नवे सुपरहिरो बघावयास मिळणार आहेत. ‘डेडपूर-२’ हा चित्रपट १८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाने जगभरात कमाईचे नवनवे रेकॉर्ड निर्माण केले होते. अशात दुसºया भागाबद्दलही प्रेक्षकांना प्रचंड आतुरता लागून आहे. ‘डेडपूल’च्या या दुसºया भागातही रेयान रेनॉल्ड्स बघावयास मिळणार आहे. ‘डेडपूल-२’मध्ये रेयानव्यतिरिक्त ‘अ‍ॅवेंजर्स इन्फिनिटी वॉर’मध्ये थानोसची भूमिका साकारणारा जोश ब्रोलिन दिसणार आहे. तो या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याच्या व्यतिरिक्त मोनेका बकारिन, जूलियन डेनिसन, जॅजी बीट्स आणि टीजे मिलर दिसणार आहेत. ‘डेडपूल-२’ला डेविड लेच यांनी दिग्दर्शित केले आहे, तर चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये रेयान रेनॉल्ड्स याच्या नावाचाही समावेश आहे. 
Web Title: 'Deadpool-2' Hindi trailer release; 'The' superstar gave Thanos voice!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.