‘मेट गाला 2019’च्या ‘त्या’ लूकची कथा; जे पाहिल्यानंतर अनेकांना आली भोवळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:40 PM2019-05-08T15:40:34+5:302019-05-09T12:02:44+5:30

‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर चित्रविचित्र, अतरंगी कपडे, ट्रिपी मेकअप करून उतरलेल्या ललनांना पाहून अनेकांना धक्क्यावर धक्के बसले. एजरा मिलरला पाहून तर अनेकांना भोवळ आली.

the crazy makeup story of ezra miller in met gala 2019 | ‘मेट गाला 2019’च्या ‘त्या’ लूकची कथा; जे पाहिल्यानंतर अनेकांना आली भोवळ!!

‘मेट गाला 2019’च्या ‘त्या’ लूकची कथा; जे पाहिल्यानंतर अनेकांना आली भोवळ!!

googlenewsNext
ठळक मुद्देया मेकअपची सुरुवात झाली पहाटे ४ वाजतो. पाच तासानंतर तो तयार झाला. सकाळी ९.३० वाजता एजराचा फायनल लूक तयार झाला.

यंदाचा ‘मेट गाला 2019’ हा फॅशनचा उत्सव मानला जाणारा इव्हेंट अनेकार्थाने गाजला. ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर चित्रविचित्र, अतरंगी कपडे, ट्रिपी मेकअप करून उतरलेल्या ललनांना पाहून अनेकांना धक्क्यावर धक्के बसले. हॉलिवूडचा मल्टिटॅलेंटेड अभिनेता एजरा मिलरला पाहून तर अनेकांना भोवळ आली.होय, एजरा मिलर ‘मेट गाला 2019’मध्ये एक मास्क घालून पोहोचला. ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर मास्क घालूनच एजराची एन्ट्री झाली. हळूहळू त्याने आपले मास्क हटवणे सुरु केले आणि त्याचा मेकअप पाहून अनेकांना गरगरायला झाले. होय, चक्क गरगरायला झाले.
एजराच्या चेह-यावर सात डोळे होते. त्याचे मेकअप इतके ट्रिपी होते की, ते पाहणा-यांचे डोळे गरगरले. कॅनडाची मेकअप आर्टिस्ट मिमी कोई हिने हे मेकअप केले होते. अलीकडे या मेकअपबद्दल मिमीने एका वेबसाईटला मुलाखत दिली. 


यंदाच्या ‘मेट गाला 2019’ची थीम ‘कॅम्प: नोट्स आॅन फॅशन’ होती. कॅम्पचा अर्थ, एक असे ट्रॉन्सफॉर्मेशन, ज्यातून प्रत्येक व्यक्तिने गेले पाहिजे. मिमीने ही थीम लक्षात घेऊन एजराच्या चेह-यावर सात डोळे रंगवण्याचा निर्णय घेतला. मिमीच्या मते, हे सात डोळे माणसाच्या आत लपलेल्या विविध स्वभावाचे प्रतिनिधित्व करणारे आहे.
मिमी सांगते, या इव्हेंटआधी माझी आणि एजराच्या अनेक बैठका झाल्या होत्या. मी असे मेकअप याआधी केले होते. एजराने यासाठी संमती दिली आणि आम्ही त्यावर प्रचंड मेहनत घेतली. माणूस त्याच्या स्वभावाचे अनेक पैलू जगापासून लपवतो. आपल्या आतला खराखरा व्यक्ति जगापुढे येईल, या भीतीने घाबरतो. कधीकधी आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारायला हवे. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता, तुम्ही जगापुढे यायला हवे.



असा झाले मेकअप
या मेकअपची सुरुवात झाली पहाटे ४ वाजतो. पाच तासानंतर तो तयार झाला. सकाळी ९.३० वाजता एजराचा फायनल लूक तयार झाला. पण पूर्णदिवस मिमीला एजरासोबत राहावे लागले. कारण यादरम्यान तिला अनेकदा या लूकला टचअप करावे लागले.

Web Title: the crazy makeup story of ezra miller in met gala 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.