‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने दोनच दिवसांत कमावले १०० कोटी, तोडला ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 01:10 PM2019-04-28T13:10:40+5:302019-04-28T13:11:14+5:30

केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा बिझनेस केला आणि भारतात आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत एक अनोखा विक्रम नोंदवला.

box office collection avengers endgame earns 104.50 crore in 2 days | ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने दोनच दिवसांत कमावले १०० कोटी, तोडला ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने दोनच दिवसांत कमावले १०० कोटी, तोडला ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने एस एस राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली 2’लाही मागे टाकले.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असे प्रेक्षकांना झाले होते. अखेर गत शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या चित्रपटावर उड्या पडल्या. पहिल्याच दिवशी या चित्रपटात ५० कोटींची कमाई केली आणि दुस-या दिवशीही इतकाच  गल्ला जमवत, १०० कोटींपर्यंत मुसंडी मारली. म्हणजेच केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा बिझनेस केला आणि भारतात आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत एक अनोखा विक्रम नोंदवला.




ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५३.१० कोटी रूपयांचा बिझनेस केला. दुस-या दिवशी कमाईत थोडी घट झाली. पण तरीही चित्रपटाने ५१.४० कोटी कमावले. याचसोबत ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या दोन दिवसांच्या कमाईचा एकूण आकडा १२४.४० कोटींवर पोहोचला.
‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूडपट भारताच्या २८४५ स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या चित्रपटांपेक्षा अधिक स्क्रिन्स ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला मिळाल्या आहेत.

तोडला ‘बाहुबली 2’चा हा रेकॉर्ड
‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने एस एस राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली 2’लाही मागे टाकले. ‘बाहुबली 2’ने पहिल्या तीन दिवसांत १०० कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ने दोनचं दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला.

 

Web Title: box office collection avengers endgame earns 104.50 crore in 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.