बॉण्ड गर्ल हॅले बेरी मुंबई येथे पोहोचली असून, मुंबईचा फेरफटका मारण्याचा ती आनंद घेत आहे. याचा पुरावा म्हणून तिने मुंबईच्या रस्त्यावर फिरतानाचे दोन फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये मुंबईतील सूर्योदय दिसत आहे, तर दुसºया फोटोत मुंबईच्या रस्त्यावर ती चालताना दिसत आहे. हॅलेने सूर्योदयाचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘आज मुंबईमध्ये सूर्योदय बघितला’, तर दुसºया फोटोत मुंबईतील रस्त्यावर तुरळक गर्दीत चालताना दिसत आहे. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही. परंतु त्याचबरोबर मुंबईकरांनी तिला ओळखले नसावे हेदेखील तिच्या या फोटोवरून स्पष्ट होते. 





या फोटोला कॅप्शन देताना हॅले बेरीने लिहिले की, ‘हरवून जाण्यासाठी वेळ काढा’. हॅलेचे भारतासोबत कनेक्शन तेव्हा सुरू झाले जेव्हा २०११ मध्ये तिने तिच्या ‘क्लाउट एटलस’ या चित्रपटात हातावर मेहंदी, बांगड्या आणि साडी परिधान केली होती. तिचा हा भारतीय अंदाज त्यावेळी चांगलाच गाजला होता. भारतातील तिच्या चाहत्यांनी त्यावेळी तिचे कौतुकही केले होते. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत हॅलेने म्हटले होते की, ‘मी जगातील सर्वात जुन्या संस्कृतीविषयी अधिकाधिक जाणून घेऊ इच्छिते.’ दरम्यान, कालच आॅस्कर विजेत्या हॅलेला भेटण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झा आणि बिझनेस वुमन अनन्या बिरला गेल्या होत्या. तिघीही एका खासगी इव्हेंटमध्ये एकत्र आल्या होत्या. तिघींमध्ये पर्यावरणात होत असलेल्या बदलांबाबत चर्चा झाली. 


 

दियाने तिच्या ट्विटर अकाउंटवर हॅले आणि अनन्यासोबतचा तिचा एक फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘जग लहान होत असून, मुली आपल्या जागेच्या मालकीण बनत आहेत. अनन्या बिरला आणि मी आज खूपच प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या हॅले बेरीला भेटलो. ती खूपच विनम्र, बुद्धिमान आणि दयाळू महिला आहे. ‘भारताचे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यासोबत चर्चा करून खूपच चांगले वाटते.’ तसेच अनन्यानेदेखील हॅलेसोबतचा फोटो शेअर करून ‘तू प्रेरणा आहेस’ अशा शब्दात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 
Web Title: Bondargal was walking on the streets of Mumbai, but no one knew her!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.