इंदिरा वर्मा हे नाव कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल, परंतु या अभिनेत्रीने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील दबदबा निर्माण केला आहे. आज हॉलिवूडमध्ये इंदिरा एवढी फेमस आहे की, तिथले फॅन्स तिच्या अदा बघण्यासाठी आतुर असतात. बॉलिवूडमधून आपल्या करिअरला सुरुवात करणाºया इंदिराने हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली अन् बघता-बघता ती तेथील सुपरस्टार झाली. वास्तविक इंदिराला प्रसिद्ध टीव्ही सीरिज ‘गेम आॅफ थ्रोन्स’ने ओळख मिळवून दिली. सध्या ती या सीरिजमध्ये काम करीत असून, तिचे बोल्ड आणि हॉट सीन्स चाहत्यांना घायाळ करणारे ठरत आहेत. ‘गेम आॅफ थ्रोन्स’मध्ये काम करताना इंदिराने बरेचसे न्यूड सीन्स दिले आहेत. ज्यामुळे ती नेमहीच चर्चेत असते. हॉलिवूडमध्ये तिला बोल्डनेसमुळेच ओळखले जात आहे. तसेच प्रत्येकजण तिच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. ४३ वर्षीय इंदिराने करिअरची सुरुवात १९९५ मध्ये आलेल्या ‘कामसूत्र : अ टेल आॅफ लव्ह’मधून केली. पहिल्याच चित्रपटात तिने असे काही बोल्ड सीन्स दिले की, ज्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगायला लागली. त्यानंतर तिने बºयाचशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले, परंतु तिचे चित्रपट फारसे यशस्वी ठरू न शकल्याने तिने हॉलिवूडमध्ये नशीब अजमाविण्यास सुरुवात केली. आता तर इंदिराने बॉलिवूडचा नाद सोडून दिला असून, हॉलिवूडवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. इंदिराने बॉबी देओल आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु चाहत्यांच्या स्मरणात ते ‘कामसूत्र’मुळेच राहिले. कारण इंदिराच्या ‘कामसूत्र’ चित्रपटातील एक सीन लीक झाल्याने खळबळ उडाली होती. असो, सध्या ती बॉलिवूडपासून दूर असून, हॉलिवूडमध्ये नशीब अजमावत आहे. विशेष म्हणजे इंदिरा हाइएस्ट पेड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. तिचे वार्षिक उत्पन्न १० अरब इतके आहे. चित्रपटांव्यतिरिक्त इंदिराने बºयाचशा टीव्ही सीरिजमध्ये काम केले आहे. इंदिराने ‘गेम आॅफ थ्रोन्स’मध्ये २०१४ पासून काम करण्यास सुरुवात केली. इंदिराने अभिनेता कॉलिन टिरनी याच्याशी विवाह केला असून, तिला एवलिन नावाची एक मुलगी आहे. चित्रपटांव्यतिरिक्त इंदिरा मॉडेलिंगमध्येही नशीब अजमावत आहे. 
Web Title: Bollywood actress is 'very bold' in 'Game Of Thrones' Her earnings will be shocked if you earn!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.