Bollywood actress took Uttar Pradesh's child adoption, shared photos! | हॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर!

भारतीय संस्कृती विदेशी लोकांसाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरली आहे. सर्वसामान्य विदेशीच नव्हे तर विदेशी सेलिब्रिटीदेखील भारतीय संस्कृतीबद्दल प्रभावित झाले आहेत. सध्या हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मारिया एग्रोपोलिस भारतात आली असून, याठिकाणच्या विविध स्थळांना ती भेटी देत आहे. सध्या मारिया उत्तर प्रदेशात आहे. सामाजिक कार्याची आवड असलेली मारिया सध्या येथील मुलांच्या शिक्षणाविषयी आणि त्यांच्या पोषणाविषयी लोकांच्या भेटीगाठी घेत आहे. त्याचबरोबर या विषयावर त्यांच्याशी चर्चाही करीत आहे. मारिया याठिकाणी दोन कारणांमुळे आली आहे. एक म्हणजे श्रीकृष्ण भक्तीत लीन होणे अन् दुसरे सामाजिक कार्य करणे. 
 

कॅनेडियन असलेल्या मारिया एमी अवॉर्ड नॉमिनेटीड हॉलिवूडपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मारियाने उत्तर प्रदेशातील ब्रज येथे पोहोचल्यानंतर एका शाळेतील विद्यार्थ्यासोबत बराच वेळ घालविला. भारतीय संस्कृती जवळून जाणून घेण्यासाठी मारियाने येथील मुलांची चर्चा केली. तसेच भारतीय संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केला. फूड फॉर लाइफ आॅर्गनायजेशनच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या शाळेलाही मारियाने भेट दिली. तसेच एका मुलाला दत्तकही घेतले. मारिया या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करणार आहे. 
 

मारियाने तिच्या या ट्रीपचे बरेचसे फोटोज आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. २०१७ मध्ये मारिया फूड फॉर लाइफ आॅर्गनायजेशनशी जोडली गेली. मारियाने या संस्थेच्या मदतीसाठी लॉस एंजेलिस येथे फूड फॉर लाइफ वृंदावन या इव्हेंटचे आयोजनदेखील केले होते. २००९ मध्ये आपले करिअर सुरू करणाºया मारियाने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, या टूरदरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि भारतीय संस्कृतीबद्दल जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. भगवान श्रीकृष्ण आणि भारताबद्दल जाणून घेण्याचे माझे लहानपणासूनच स्वप्न होते. फूड फॉर लाइफ आॅर्गनायजेशनच्या माध्यमातून ते पूर्ण झाले. 
Web Title: Bollywood actress took Uttar Pradesh's child adoption, shared photos!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.