Bollywood actor Mark Selling guilty of child pornography commits suicide! | ​चाईल्ड पोर्नोग्राफीचा दोषी हॉलिवूड अभिनेता मार्क सेलिंगची गळफास लावून आत्महत्या!

हॉलिवूड अभिनेता मार्क सेलिंग याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. मंगळवारी रात्री मार्कने गळफास लावून आत्महत्या केली. ३५ वर्षांचा मार्क डिसेंबर २०१७ मध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचा दोषी आढळला होता. यावर्षी मार्चमध्ये याप्रकरणी मार्कला शिक्षा सुनावली जाणार होती. पण त्यापूर्वीच मार्कने आपल्या राहत्या घरी गळफास लावून स्वत:ला संपवले.
चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी दोषी आढळलेल्या मार्कला किमान ५ ते ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होणार होती. मार्कने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापूर्वी आॅगस्ट २०१७ मध्ये आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मार्कच्या मागे त्याचे आई वडिल व एक भाऊ असा परिवार आहे. ‘Glee’ या अमेरिकन टेलिव्हिजन सीरिजमुळे मार्क लोकप्रीय झाला होता. मार्क हा एक संगीतकारही होता. संगीतक्षेत्रात त्याने  त्याने ‘पाईप ड्रिम्स रेकॉर्ड्स’ नावाची एक कंपनी उघडली. या कंपनीअंतर्गत २०१० मध्ये ‘पाईप ड्रिम्स’ हा अल्बम आणला होता. जानेवारी २०१३ मध्ये तो लैंगिक शोषणाचा आरोपात अडकला होता. एका महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पण हे प्रकरण कोर्टाबाहेर निकाली काढून तो यातून सुटला होता. डिसेंबर २०१५ मध्ये त्याच्यावर चाईल्ड पोर्नाेग्राफीचा आरोप केला गेला. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. मे २०१६ मध्ये त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. यानंतर लगेच अदी शंकर यांच्या ‘गॉड अ‍ॅण्ड सीक्रेट’ या चित्रपटातून मार्कची हकालपट्टी करण्यात आली होती. सप्टेंबवर २०१७ मध्ये त्याच्यावरील खटल्याची सुनावणी सुरु  झाली होती. येत्या मार्चमध्ये त्याला शिक्षा सुनावली जाणार होती. पण त्याआधीच मार्कने स्वत:ला शिक्षा देत, आत्महत्या केली.  

Web Title: Bollywood actor Mark Selling guilty of child pornography commits suicide!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.