Blake Lively says, Even if the life was saved for the protection of girls. | ब्लेक लिव्हली म्हणते, मुलींच्या रक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर!!

हॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांच्या चित्रपट आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असतात; मात्र हॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अ‍ॅक्ट्रेस ब्लेक लिव्हली एका वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आली आहे. वुमन ओरिएंटेड शोमध्ये सहभागी झालेल्या ब्लेकने म्हटले की, ती तिच्या जेम्स आणि आइन्स या मुलींच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव देखील धोक्यात घालू शकते. 

ब्लेकचे हे वक्तव्य खळबळजनक असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर बोट दाखविणारे आहे. जागतिक स्तरावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत किती मोठ्या प्रमाणावर उपाययोजनांची गरज आहे, हेच ब्लेकच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. या इव्हेंटमध्ये ब्लेकने चाइल्ड पोर्नोग्राफी या विषयावर अतिशय भावनिक असे भाषण दिले. यावेळी ब्लेकने म्हटले की, मुलांसोबत होणाºया या छळाचा मी तीव्र शब्दात निषेध करते. तसेच तिने हेही स्पष्ट केले की, यासर्व परिस्थितीशी लढा देण्यासाठी ती चाइल्ड रेस्क्यू कोलाइनेशन नावाच्या एका संस्थेशी जोडलेली आहे. ही संस्था मुलांशी संबंधित अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे रेस्क्यू करण्याचे काम करीत असते. तसेच या गुन्ह्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे काम करीत असते. 
Web Title: Blake Lively says, Even if the life was saved for the protection of girls.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.