Black Panther Box Office Collection: Black Panther's Big Shoot! | Black Panther Box Office Collection : भारतात ‘ब्लॅक पॅँथर’ची जरबदस्त धडक!

मार्व्हल स्टुडिओने ‘एव्हेंजर्स, स्पायडरमॅन, थॉर रॅग्नरॉक, कॅप्टन अमेरिका’ आदी चित्रपटांच्या माध्यमातून सुपरहीरोंना प्रेक्षकांसमोर आणले. आता पुन्हा एकदा असाच एक अ‍ॅक्शन सुपरहीरोला त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. होय, ‘ब्लॅक पॅँथर’ या चित्रपटातून हा सुपरहीरो बघावयास मिळणार असून, शुक्रवारी हा चित्रपट जगभर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर आपला जलवा दाखविला आहे. भारतात हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षक हा चित्रपट टू डी ऐवजी थ्री डी, आयमॅक्स, फोर डी मॅक्समध्ये बघणे अधिक पसंत करीत आहेत. लहान मुले आणि तरुणांमध्ये ‘ब्लॅक पॅँथर’बद्दल चांगलीच क्रेझ बघावयास मिळत आहे. 
 
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ब्लॅक पॅँथर’ने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर जबरदस्त सुरुवात केली. ‘ब्लॅक पॅँथर’ने भारतात पहिल्याच दिवशी ५.६० कोटी रुपयांची कमाई केली. तर गुरुवारी पेड प्रीव्ह्यूमध्ये चित्रपटाने तब्बल ३५ लाखांचा गल्ला जमविला. ज्यापद्धतीने चित्रपटाने शुक्रवारी कमाई केली, त्यावरून वीकेण्डमध्ये हा चित्रपट आणखी जोरदार कमाई करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: लहान मुले चित्रपट बघण्यासाठी अधिक आग्रह करताना दिसून येत असल्याने चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगली मजल मारेल, असेच काहीसे चित्र दिसत आहे. दरम्यान, चित्रपटात अमेरिकी आणि आफ्रिकी कलाकारांची संख्या अधिक आहे. या सर्वच कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला असून, त्यास प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. वास्तविक मार्व्हल स्टुडिओच्या एव्हेंजर्सचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे, अशात ‘ब्लॅक पॅँथर’ प्रेक्षकांना जबरदस्त अ‍ॅक्शन दाखविण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. 
Web Title: Black Panther Box Office Collection: Black Panther's Big Shoot!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.