Black Panther Box Office Collection: Black Panther created history on the box office, read so far! | Black Panther Box Office Collection : ‘ब्लॅक पँथर’ने बॉक्स आॅफिसवर रचला इतिहास, वाचा आतापर्यंतचे कलेक्शन!

डिजनी आणि मार्वेल स्टुडिओचा ‘ब्लॅक पॅँथर’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर एक नवा कीर्तिमान रचन्याची शक्यता आहे. होय, चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जगभरात जवळपास १३०० कोटी रूपयांची कमाई केली आहे, तर भारतात आतापर्यंत ३० कोटी रूपयांचा गल्ला जमविला आहे. १६ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग डेपासूनच प्रेक्षकांना आपलेसे केले. शिवाय ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत ‘ब्लॅक पॅँथर’ने पाचवे स्थान मिळविले आहे. या अगोदर ‘द एवेंजर्स, स्टार वॉर्स आणि स्टार वॉर्स लास्ट जेडी’ या चित्रपटांनी हा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे ‘ब्लॅक पॅँथर’ने ‘डेडपूल’ही यात मागे सोडले आहे. 

‘ब्लॅक पॅँथर’मध्ये कॅडविक बोसमॅन यावेळी सुपरहिरोच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. या चित्रपटाला आतापर्यंतची सर्वांत मेगा लेवलचा मार्वेल चित्रपट म्हणून संबोधले जात आहे. वास्तविक हा चित्रपट बºयाच अंगाने विशेष म्हणावा लागेल. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, ‘ब्लॅक पॅँथर’ मार्वेल स्टुडिओचा पहिला असा चित्रपट आहे ज्यामध्ये मुख्य भूमिकांमध्ये अश्वेत कलाकार आहेत. स्टार कास्टविषयी सांगायचे झाल्यास चित्रपटात न्योंगो, मायकल बी., जॉर्डन, दनई गुरिरा, लेटिटिया राइट, एंजेला बॅसेट, फोरेस्ट व्हिटाकार आणि मार्टिन फ्रीमॅन यासारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाल्यास, वकांडा नावाच्या अशा एका काल्पनिक देशाची कथा आहे, ज्याठिकाणच्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा तचाला शत्रूंबरोबर दोन हात करून आपली शक्ती मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. याच युद्धात शत्रू संपूर्ण जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ब्लॅक पॅँथर नावाचा सुपर हिरो आपल्या टीमसोबत एका मिशनवर निघतो. अर्थात हे मिशन जगाला वाचविण्याचे असते. चित्रपटाच्या कमाईविषयी सांगायचे झाल्यास या चित्रपटाने आतापर्यंत भारतात जबरदस्त कमाई केली आहे. भारतीय प्रेक्षकांना सुपरहिरो आणि चित्रपटातील ग्राफिक्स इफेक्ट खूपच भावत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने ३० कोटी रूपयांचा गल्ला जमविला आहे. पुढच्या काळात यात भर पडण्याची शक्यता आहे. 
Web Title: Black Panther Box Office Collection: Black Panther created history on the box office, read so far!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.