आयर्न मॅनचा ११ वर्षाचा प्रवास, कसा होता रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअरचा सेटवरचा शेवटचा दिवस?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:53 PM2019-05-09T14:53:47+5:302019-05-09T14:59:07+5:30

हॉलिवूडच्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअरने २००८ मध्ये आयर्न मॅन रूपात धमाकेदार एन्ट्री घेतली होती.

Avengers Endgame director reveals Robert Downey Jounior last day on set | आयर्न मॅनचा ११ वर्षाचा प्रवास, कसा होता रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअरचा सेटवरचा शेवटचा दिवस?

आयर्न मॅनचा ११ वर्षाचा प्रवास, कसा होता रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअरचा सेटवरचा शेवटचा दिवस?

googlenewsNext

हॉलिवूडच्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअरने २००८ मध्ये आयर्न मॅन रूपात धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मार्व्हल स्टुडिओमध्ये हे त्याचं डेब्यू होतं. त्यानंतर मार्व्हलच्या आयर्न मॅन सीरिजमध्ये त्याने काम केलं. धमाकेदार अ‍ॅक्शन करणारा आणि तेवढाच ह्यूमर असलेला हिरो प्रेक्षकांना चांगलाच आवडला. त्यानंतर रॉबर्टने ११ वर्षांपर्यंत मार्व्हल सिनेमासाठी आयर्न मॅनचा रोल केला आणि २९ एप्रिलला रिलीज झालेल्या Avengers Endgame मध्ये तो शहीद झाला.

आयर्न मॅनच्या मृत्यूच्या दृश्याने प्रेक्षकांची डोळे पाणावले. चीनचा एक चाहता तर इतका रडला की, त्याला थेट रूग्णालयात दाखल करावे लागले. रॉबर्टसाठीही या सिनेमाचं शूटींग करणं एक अविस्मरणिय आणि भावनिक अनुभव राहिला असेल. एका मुलाखतीतून Avengers Endgame च्या सेटवरील रॉबर्टचा शेवटचा दिवस कसा होता हे दिग्दर्शक जो रूसो याने सांगितले आहे. 

(Image Credit : NME.com)

एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जो रूसोने सांगितले की, 'रॉबर्ट हा जगातला सर्वात प्रेमळ आणि चांगला माणूस आहे. पण सोबत मला वाटतं की, भावनात्मक क्षणांमध्ये अधिक भावनिक होणं त्याला पसंत आहे. आम्ही त्याला मिठी मारली...त्याच्याशी हात मिळवला....आणि क्रू ने टाळ्यांचा एकच कडकडाट केला. मला हे तेच होतं जे त्याला आमच्याकडून अपेक्षित होतं'.

रॉबर्टने  त्याच्या इन्स्टाग्रामवर पेज एक फोटो शेअर केला असून त्यात एंडगेमची संपूर्ण स्टारकास्ट बघायला मिळत आहे. हा फोटो केवळ १२ तासात ४६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केलाय. 

रूसोने सांगितले की, 'त्याला समाधानाची जाणीव झाली, त्याने काम केलं आणि तो आनंदी होता. यात आता अधिक राहू नये असं त्याला वाटत होतं. त्याच्यासाठी हा प्रवास शानदार होता. त्याने आयुष्यातील ११ वर्ष दिले. त्याला त्याच्या क्षमतेला आणखी व्यापक करायचं होतं. तरी सुद्धा तो ११ वर्ष मार्व्हलसोबत कसा जुळून राहिला. हे सांगण्यासाठी मला तुलनात्मक व्हावं लागेल'.

Web Title: Avengers Endgame director reveals Robert Downey Jounior last day on set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.