Avenger Star Chris Hemsworth says, 'Like mobile addiction drug addiction'! | अ‍ॅव्हेंजर स्टार क्रिस हेम्सवर्थ म्हणतो, ‘मोबाइलचा लळा ड्रग्सच्या व्यसनाप्रमाणे’!

आॅस्ट्रेलियन अभिनेता क्रिस हेम्सवर्थ लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘अ‍ॅव्हेंजर थोर’चा स्टार असलेला क्रिस हेम्सवर्थ आता ‘थॉर राग्नारोक’ या चित्रपटात अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने मोबाइल आणि त्यावर येणाºया मॅसेजेसविषयी असलेला तिटकारा जाहीरपणे बोलून दाखविला आहे. 

एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत क्रिसने म्हटले की, तंत्रज्ञानाचा आता नातेसंबंधांवर परिणाम होत आहे. फोन हे नैराश्याचे कारण ठरत आहे. क्रिस पुढे म्हणतो की, मी फोन कॉल उचलताना प्राधान्यक्रम ठरवित असतो. हे फोन कॉल, मॅसेज मला माझ्या मुलांपासून आणि माझ्या आवडीच्या गोष्टींपासून दूर ओढत असतात. मी मात्र मला हवे तेच करीत असतो. पण समाजाविषयी जर बोलायचे झाल्यास आपण मौखिक संवादात मागे पडत आहोत, हे वास्तव आहे. पुढे बोलताना क्रिस म्हणतो की, मला इतरांविषयी माहिती नाही, परंतु मला तरी फोनमुळे नैराश्य जाणवते. मला जेव्हा एखादा मॅसेज येतो तेव्हा मला असे जाणवते की, मी ड्रग्जसारख्या अंमली पदार्थाच्या आहारी गेलो आहे. मी तर म्हणेल की, तुम्ही तुमचा फोन तुमच्या बिछान्याजवळ अजिबातच ठेवू नका. शिवाय जेवतानाही जवळ ठेवू नका. कारण तुमचे लक्ष त्यावेळी एकाग्र होत नाही, असेही क्रिसने म्हटले. 
Web Title: Avenger Star Chris Hemsworth says, 'Like mobile addiction drug addiction'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.