Aishwarya Rai was also on the look of the creator of sexual harassment of 13 actresses! | १३ अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करणाºया ‘या’ निर्मात्याचा ऐश्वर्या रायवरही होता डोळा !

सध्या हॉलिवूडमध्ये निर्माता हार्वे विंस्टिन हे नाव खूपच चर्चिले जात आहे. अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली आणि ग्वेनेथ पेल्ट्रोसहीत तब्बल १३ अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या हार्वे विंस्टिनबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड वेबसाइटने केलेल्या दाव्यानुसार हार्वेचा डोळा अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यावरदेखील होता. त्याने ऐश्वर्याला एकांतात भेटण्याची इच्छाही व्यक्त केली होती. परंतु तशी संधी त्याला मिळाली नाही. 

खरं तर ऐश्वर्याच्या व्यवस्थापकाने हार्वेचे हे मनसुबे उधळून लावले आहेत. त्याने त्याची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ दिली नाही. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, व्यवस्थापक सिमोन शेफिल्डने सांगितले की, मी भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होतो. हार्वेसोबत एक डिल करताना माझ्या लक्षात आले की, त्याला ऐश्वर्याशी एकांतात भेटायचे आहे. तो तिला एकांतात भेटण्यासाठी खूपच उत्सुक होता. याविषयी त्याने बºयाचदा माझ्याकडे वाच्यतादेखील केली. मात्र मी अतिशय नम्रपणे त्यास याकरिता नकार दिला.  पुढे बोलताना सिमोन शेफिल्डने सांगितले की, ‘जेव्हा मी हार्वेच्या आॅफिसबाहेर येत होतो, तेव्हा त्याने मला पुन्हा एकदा विचारले की, तिला (ऐश्वर्या) एकांतात भेटण्यासाठी मला काय करावे लागेल? परंतु मी त्याच्या या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होतो. जेव्हा त्याच्या ही बाब लक्षात आली तेव्हा त्याने मला धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमच्यासोबत कुठलेही काम करायचे नसल्याचेही सांगितले. तेव्हा मीदेखील हार्वेला जशास तसे उत्तर दिले. मी त्याला म्हटले की, मलादेखील अशा क्लाइंट्ससोबत काम करण्यास कुठलीच उत्सुकता नाही. 

रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूडमधील बरेचसे निर्माते अभिनेत्री आणि मॉडेल्सला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये एकांतात भेटतात. त्यानंतर त्यांच्याशी दुर्व्यवहार करतात. बºयाचशा अभिनेत्रींनी ही बाब उघडपणे सांगितली असल्याने हॉलिवूडमधील अनेक निर्माते तथा दिग्दर्शकांचा पर्दाफाश होत आहे. 
Web Title: Aishwarya Rai was also on the look of the creator of sexual harassment of 13 actresses!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.