'This' actress picked a topless photo from her four-year-old daughter; The explosion of users flew on the installagram! | ‘या’ अभिनेत्रीने आपल्या चार वर्षीय मुलीकडून काढला टॉपलेस फोटो; इन्स्टाग्रामवर उडाला युजर्सचा भडका!

अमेरिकन रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक टॉपलेस फोटो शेअर केला. मात्र या फोटोमुळे ती ट्रोल्स होताना दिसत आहे. कारण किमने हा टॉपलेस फोटो चक्क तिच्या चार वर्षीय मुलीला काढायला लावला आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवर युजर्सचा जबरदस्त भडका झाला आहे. किमने तिची चार वर्षीय मुलगी नॉर्थ वेस्ट हिच्याकडून हा फोटो काढून घेतल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे युजर्सचा संताप होत असून, काहींनी तिला ‘चाइल्ड अब्यूज’ असे म्हटले आहे. 

किम सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करीत असते. अशात काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला. फोटोमध्ये ती आरशासमोर टॉपलेस होताना दिसत आहे. मात्र त्याचबरोबर फोटोत तिची चार वर्षीय मुलगी नॉर्थ वेस्ट तिचा फोटो काढताना दिसत आहे. वास्तविक ती फ्लॅश लाइटमुळे स्पष्टपणे दिसत नाही. परंतु ती तिची मुलगीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण किमनेच फोटोच्या कॅप्शनमध्ये हा फोटो नॉर्थने काढल्याचे म्हटले आहे. किमचा हा फोटो आतापर्यंत २७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. तर ४४ हजार युजर्सनी त्यास कॉमेण्ट दिल्या आहेत. 
 

मात्र युजर्सच्या जवळपास सर्वच कॉमेण्ट संतापजनक आहेत. काही इन्स्टा युजर्सचे म्हणणे आहे की, ‘किमने पब्लिसिटी मिळविण्यासाठी खूपच घाणेरडा फंडा वापरला आहे.’ काही युजर्सनी तिचा हा प्रकार ‘चाइल्ड अब्यूज’शी संबंधित असल्याचे म्हटले. तर काहींनी, ‘लहान मुलांना तरी सोड, कारण ते आता मोठे होत आहेत, तू त्यांना नेमके काय संस्कार देऊ इच्छिते?’ असे प्रश्न उपस्थित केले. वास्तविक पहिल्यांदाच किमला युजर्सनी ट्रोल केले असे नाही तर यापूर्वीदेखील तिला तिच्या फोटोवरून ट्रोल करण्यात आले आहे.
Web Title: 'This' actress picked a topless photo from her four-year-old daughter; The explosion of users flew on the installagram!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.