The actress is dating the boy who is 12 years old after the divorce of her husband! | पतीला घटस्फोट दिल्यानंतर १२ वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूला डेट करीत आहे ‘ही’ अभिनेत्री!

हॉलिवूडची अभिनेत्री लॉरा डर्न काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. होय, लॉरा एका बास्केटबॉल खेळाडूला डेट करीत असून, त्यामुळे ती चर्चेत आली आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात नवीन काय? तर ५० वर्षीय लॉरा चक्क तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या एक खेळाडूला डेट करीत आहे. लॉरा अमेरिकेची अभिनेत्री असून, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही तिने चुणूक दाखविली आहे. 

लॉरापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडचे नाव बेरोन डेविसला असे आहे. डेविसने नुकताच त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला असून, तो आता लॉराला डेट करीत आहे. मात्र दोघांकडूनही त्यांच्यातील नात्याचा अधिकृत खुलासा केला नाही. परंतु दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, हेही तेवढेच खरे आहे. बुधवारी यूएस वीकलीने लॉरा आणि डेविसचे काही फोटो प्रकाशित केले आहे. या दोघांचेही फोटो चांगलेच रोमॅटिकआहेत. यावरून हे दिसून येते की, दोघेही एकमेकांच्या किती जवळ आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा हा फोटो गेल्या २० डिसेंबर रोजीचा आहे. 

दरम्यान, लॉरा दोन वर्षांपूर्वीच पती बेन हार्परपासून घटस्फोट घेऊन वेगळी झाली आहे. बेनसोबत तिने २००५ मध्ये लग्न केले होते आणि दोघांना दोन मुलेही आहेत. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तेच डेविसने तीन महिन्यांपूर्वीच पत्नीपासून घटस्फोट घेतला. लॉराने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ती १३ ते १४ वर्षांची असताना तिचं लैंगिक शोषण झाले होते. तेव्हा ती चर्चेत आली होती.
Web Title: The actress is dating the boy who is 12 years old after the divorce of her husband!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.