Women's hockey team's first defeat | महिला हॉकी संघाचा पहिला पराभव
महिला हॉकी संघाचा पहिला पराभव

सेऊल : भारतीय महिला हॉकी संघाला पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसºया सामन्यात पहिल्यांदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. यजमान संघाकडून स्यूल की चियोन हिने १२ व्या आणि यूरिम ली हिने १४ व्या मिनिटाला गोल केला. पहिल्याच क्वार्टरमध्ये दोन
गोल नोंदविणाºया यजमानांनी भारतावर २-१ असा विजय साजरा केला. भारताकडून १६ व्या मिनिटाला लालरेमसियामी हिने गोल नोंदविला, पण अन्य खेळाडूंचे प्रयत्न अपयशी ठरताच पराभवाची निराशा पदरी पडली. भारत या मालिकेत २-१ ने पुढे आहे. उभय संघांनी पहिल्या १० मिनिटांच्या खेळावर एकमेकांवर वारंवार हल्ले चढविले.
कोरियाने पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर केला. दोन मिनिटांनी
पुन्हा पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत यजमानांनी २-० अशी आघाडी घेतली. दुसºया क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने चढाई करीत गोल नोंदविला. भारतीयांनी वारंवार हल्ले चढविले; पण कोरियाच्या अभेद्य बचाव फळीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. भारताला चौथ्या क्वार्टरमध्ये दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले खरे; पण कोरियाने भारताला गोलपासून वंचित ठेवले. (वृत्तसंस्था)


Web Title:  Women's hockey team's first defeat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.