महिला हॉकी संघाला मिळू शकते ‘टॉप्स’ची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 08:27 AM2018-10-01T08:27:36+5:302018-10-01T08:47:32+5:30

भारतीय महिला हॉकी संघातील सर्व सदस्यांना पुढील महिन्यात टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) जागा मिळू शकते. निरीक्षण समिती या कार्यक्रमावरून कोअर टीमची ओळख करून देईल.

Women's hockey team can get 'chance' tips | महिला हॉकी संघाला मिळू शकते ‘टॉप्स’ची संधी

महिला हॉकी संघाला मिळू शकते ‘टॉप्स’ची संधी

Next

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघातील सर्व सदस्यांना पुढील महिन्यात टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) जागा मिळू शकते. निरीक्षण समिती या कार्यक्रमावरून कोअर टीमची ओळख करून देईल. पुरुष हॉकी संघाचे १८ सदस्य यापूर्वीच टाप्समध्ये सामील झाले आहेत.

सूत्रांनुसार, महिला संघाने १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे त्यांना लवकरच बक्षिसाच्या रूपात ही संधी मिळणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिला संघाला यापूर्वीच एसीटीसी (ट्रेनिंग आणि स्पर्धेसाठी वार्षिक कॅलेंडर) मिळाले आहे. हे टाप्सअंतर्गत मिळणा-या मासिक ५० हजार रुपयांचे प्रकरण आहे.

स्पोटर््स इंडियाच्या एका अधिका-याने सांगितले की, हॉकी इंडिया महिला संघाला टॉप्समध्ये सहभागी करून घेण्यासाठी आग्रही आहे. ते म्हणाले, की हॉकी इंडियाने महिला संघाला टाप्समध्ये सामील करण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. सध्या आम्ही या प्रस्तावाचा अभ्यास करीत आहोत. त्यांना लवकरच यामध्ये सहभागी करून घेतले जाईल, अशी शक्यता आहे.

Web Title: Women's hockey team can get 'chance' tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.