भारतीय ज्युनिअर महिलांची विजयी घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:19 AM2018-07-19T03:19:10+5:302018-07-19T03:19:21+5:30

भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या सहा देशांच्या अंडर-२३ स्पर्धेत बेल्जियमचा २-० ने पराभव करीत सलग तिसरा विजय नोंदवला.

Indian Junior Women's Winning Tribe | भारतीय ज्युनिअर महिलांची विजयी घोडदौड

भारतीय ज्युनिअर महिलांची विजयी घोडदौड

Next

एंटवर्प : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या सहा देशांच्या अंडर-२३ स्पर्धेत बेल्जियमचा २-० ने पराभव करीत सलग तिसरा विजय नोंदवला.
हॉकी इंडियाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार भारतातर्फे संगीता कुमारी (३६) आणि सलीमा टेटे (४२) यांनी गोल नोंदवले. भारताने आपल्या पहिल्या लढतीत आयर्लंडचा ४-१ ने पराभव केल्यानंतर दुसऱ्या लढतीत ग्रेट ब्रिटेनविरुद्ध १-० ने बाजी मारली होती. मंगळवारी रात्री प्रीती दुबेच्या नेतृत्वाखाली भारताने चमकदार कामगिरी करताना सलग तिसरा विजय नोंदवला. पहिल्या व दुसºया क्वॉर्टरमध्ये उभय संघांना गोल नोंदविता आला नाही. भारताला अखेर तिसºया क्वॉर्टरमध्ये बेल्जियमचा बचाव भेदण्यात यश आले. संघाने ३६ व्या मिनिटाला संगीताने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. सलीमाने ४२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताची आघाडी वाढवली. भारतीय संघाने अखेरच्या क्वॉर्टरमध्येही बेल्जियमला गोल नोंदवण्याची संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले.
>भारतीय पुरुष संघाची बरोबरी
ज्युनिअर महिलांची बेल्जियममध्ये विजयी घोडदौड सुरु असली तरी भारताच्या पुरुष ज्युनिअर संघाच्या कामगिरीत चढउतार पाहायला मिळत आहे. येथे सुरु असलेल्या पाच देशांच्या २३ वर्षांखालील स्पर्धेत भारतीय संघाने यजमान बेल्जियमला १-१ असे रोखले. सलामीच्या सामन्यात भारताने आयर्लंडला ५-० असे लोळवले. मात्र यानंतर भारताला ब्रिटनविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला होता.बेल्जियमविरुद्ध भारतीयांनी पहिल्या दोन क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला. मोहम्मद उमरने मध्यंतराच्या काहीवेळाआधीच गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसºया क्वार्टरमध्ये ३४व्या मिनिटाला सिरिल फ्राइंगने गोल करत बेल्जियमला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
यानंतर अंतिम क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. परंतु, गोल करण्यात यश न आल्याने अखेर सामना बरोबरी राहिला. अंतिम फेरीसाठी आव्हान कायम राखण्यासाठी भारताला २० जुलैला नेदरलँड्सला नमवावे लागेल.

Web Title: Indian Junior Women's Winning Tribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी