भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद, पण मनप्रीतने राखला चषक आपल्याकडेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:47 AM2018-10-29T08:47:00+5:302018-10-29T08:47:17+5:30

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली.

India and Pakistan were declared joint winners at asian championship hockey | भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद, पण मनप्रीतने राखला चषक आपल्याकडेच 

भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद, पण मनप्रीतने राखला चषक आपल्याकडेच 

googlenewsNext
ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी तीनवेळा आशियाई अजिंक्यपद जिंकण्याचा मान पटकावला आहे.

ओमान: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दीड तासाहून अधिक काळ प्रतीक्षा पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. मात्र, मनप्रीत सिंगने मोठ्या चतुराईने जेतेपदाचा चषक आपल्याकडेच राहिल याची काळजी घेतली. त्याच्या या स्मार्ट खेळीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 



भारत आणि पाकिस्तान यांनी तिसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा नावावर केली. भारताने २०११ आणि २०१६ साली पाकिस्तानला नमवून जेतेपदाचा मान पटकावला होता. पाकिस्तानने २०१२ व २०१३ मध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा चषक सर्वाधिकवेळा कोण जिंकेल याची उत्सुकता होती, परंतु पावसाने त्यावर पाणी फिरवून चाहत्यांचा हिरमोड केला. 


आशियाई हॉकी महासंघाने दोन्ही संघाना संयुक्त विजेता घोषित केले. मात्र मनप्रीतच्या एका कामगिरीने जेतेपदाचा चषक भारताकडेच राहिला. चषकासोबत दोन्ही संघ फोटो काढण्यासाठी मैदानावर आले त्यावेळी मनदीप आणि मनप्रीत यांनी चषकाभवती ठाण मांडला.. मनप्रीतने पाकिस्तान संघाच्या चमूत जात चषका शेजारील जागा पटकावली. चषकाभवती भारताचेच खेळाडू दिसत होती आ त्यामुळे नेटिझन्सने मनप्रीतचे कौतुक केले.





Web Title: India and Pakistan were declared joint winners at asian championship hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.