hockey world cup 2018 opening ceremony today at bhubaneswar | Hockey World Cup 2018: हॉकी वर्ल्डकपचा आज भव्य उद्घाटन सोहळा, माधुरीसह बॉलिवूड कलाकार थिरकणार
Hockey World Cup 2018: हॉकी वर्ल्डकपचा आज भव्य उद्घाटन सोहळा, माधुरीसह बॉलिवूड कलाकार थिरकणार

ठळक मुद्देहॉकी वर्ल्डकपचा आज भव्य उद्घाटन सोहळामाधुरीसह बॉलिवूड कलाकार थिरकणार हॉकी वर्ल्डकपमध्ये एकूण 16 संघांचा समावेश

भुवनेश्वर : मंदिराचं शहर म्हणून ओळख असलेल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून हॉकी वर्ल्डकप 2018 ची सुरुवात होत आहे. येथील कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर हॉकीचे सामने रंगणार आहेत.

आज संध्याकाळी 5.30 वाजता हॉकी वर्ल्डकपचे कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर शानदार उद्धाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. 

हॉकी वर्ल्डकपमध्ये एकूण 16 संघांचा समावेश आहे. हॉकी वर्ल्डकपमध्ये उद्यापासून सुरु होणारे सामने 16 डिसेंबरपर्यंत  खेळविले जाणार आहेत. 16 संघांचे चार ग्रुप तयार करण्यात आले  आहे. भारतीय संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश आहे, तर पाकिस्तान संघाचा डी ग्रुपमध्ये समावेश आहे. हॉकी वर्ल्डकपमध्ये 28 नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचे नेतृत्व खेळाडू मनप्रित सिंग करणार आहे. 

भारतीय संघ
गोलकिपर : पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक. डिफेंडर : हरमनप्रीत सिंग, बीरेंद्र लाकडा, वरुण कुमार, कोथाजित सिंग खादांगबम, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास. मिडफिल्डर : मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग खांगजुम (उपकर्णधार), निलकांत शर्मा, हार्दिक सिंग, सुमित. फॉरवर्ड : आकाशदीप सिंग, मंदीप सिंग, दिलप्रित सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजित सिंग.
 

English summary :
Hockey World Cup 2018 begins today in Bhuvaneshwar, which is known as the temple city. Hockey matches will be played at the Kalinga International Hockey Stadium. In today's evening, at around 5.30 pm, the Hockey World Cup opening ceromony will start. Many Bollywood celebrities will be present in this opening ceremony.


Web Title: hockey world cup 2018 opening ceremony today at bhubaneswar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.