Hockey World Cup 2018: Not India, they are the strongest contenders of the winner | Hockey World Cup 2018 : यजमान भारत नव्हे, तर हे संघ आहेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार
Hockey World Cup 2018 : यजमान भारत नव्हे, तर हे संघ आहेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार

ठळक मुद्देपुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवातयजमान भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत1975 नंतर भारताला विश्वचषक जिंकता आलेला नाही

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. 16 संघांत, 19 दिवस जेतेपदासाठी 36 सामने होणार आहे. यजमान भारताकडून यंदा अपेक्षा उंचावल्या आहेत. भारताने 1975 मध्ये अखेरचा आणि एकमेव विश्वचषक जिंकला आहे. त्यानंतर भारताला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतासमोर C गटात बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. पण, या विश्वचषक स्पर्धेत यजमान म्हणून भारताकडून जेतेपदाच्या अपेक्षा असल्या तरी त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम व इंग्लंड यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे.ऑस्ट्रेलिया 
गतविजेता ऑस्ट्रेलिया येथे जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी उत्सुक आहे. 2018 मधील त्यांचा कामगिरी पाहता त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. यावर्षी त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि राष्ट्रकुल स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. एडी ओकनडेन आणि आरन जाल्युसकी या माजी कर्णधारांमुळे संघातील अन्य खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. ड्रॅक फ्लिकर मार्क नॉल्सची उणीव जाणवेल, परंतु युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ दमदार कामगिरी करण्याची धमक राखतो. 


अर्जेंटिना  
ऑलिम्पिक विजेते, विश्वचषक स्पर्धेतील माजी उपविजेते आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला अर्जेंटिनाचा संघ कोणत्याची क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याची हिम्मत राखतो. मैदानावर या संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे, परंतु मैदानाबाहेर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्रशिक्षक कार्लोत रेतेगुई यांनी राजीनामा दिला आणि जर्मनीच्या ओरोजको यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय हॉकी फेडरेशन आणि वरिष्ठ खेळाडू यांच्यातही वाद सुरू आहेत. तरीही हा संघ फ्रान्स, स्पेन व न्यूझीलंड संघांना कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. 
नेदरलँड्स 
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्स संघाने 8 वर्षांपूर्वी भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. मात्र, यंदा त्यांचा संघ फार पुढपर्यंत आगेकूच करेल अशी शक्यता कमी आहे. वरिष्ठ खेळाडू मिंक व्हेन डर व्हिडन याच्यावर ड्रॅग फ्लिकरची जबाबदारी असणार आहे. 


जर्मनी 
चार ऑलिम्पिक जेतेपद, दोन विश्वचषख आणि 10 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या जर्मनीच्या संघाकडून अपेक्षा आहेत. मात्र, हा संघ पहिल्यासारखा बलाढ्य राहिलेला नाही. त्यांनी 2014 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि तो त्यांचा अखेरचा मोठा स्पर्धा विजय होता. गत विश्वचषक स्पर्धेत जर्मनाली सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्या संघातील बरेच खेळाडू परिपक्व झाले आहेत आणि त्याचाच त्यांना फायदा मिळू शकतो. D गटात त्यांच्यासमोर नेदरलँड्स, पाकिस्तान व मलेशिया यांचे आव्हान आहे. 
बेल्जियम
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या बेल्जियमवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यांच्यासमोर C गटात यजमान भारताचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे बेल्जियम विरुद्ध भारत हा सामना उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बेल्जियमकडे कॅडरिक चार्लीयर आणि टॉम बूम ही अनुभवी जोडी आहे आणि ती कोणत्याची बचावफळीसाठी डोकेदुखी ठरू शकते. 
इंग्लंड 
इंग्लंडच्या संघातील 18 पैकी 12 खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत. पण, त्यांच्याकडे तीन विश्वचषक स्पर्धांचा अनुभव पदरी असलेला बॅरी मिडल्टन आणि दोन विश्वचषक खेळणारा अॅडम डिक्सनही आहे. त्यामुळे त्यांच्या संघात युवा व अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घालण्यात आली आहे.  


 


Web Title: Hockey World Cup 2018: Not India, they are the strongest contenders of the winner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.