Hockey World Cup 2018: India's 5-0 win over South Africa begins | Hockey World Cup 2018 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 5-0 विजय मिळवत दणक्यात सुरुवात
Hockey World Cup 2018 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 5-0 विजय मिळवत दणक्यात सुरुवात

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : यजमान भारताने हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात 5-0 असा दमदार विजय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवला. 

भारताने दोन सत्रांनंतर 2-0 अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सत्रात भारताने दोन गोल केले, तर अखेरच्या सत्रात एक गोल करत सामना 5-0 असा सहजपणे जिंकला.


सिमरनजीतने भारतासाठी हा दुसरा गोल लगावला


ललित उपाध्यायने भारतासाठी गोल चौकार लगावला


सिमरनजित सिंगने भारतासाठी तिसरा गोल केलाभारताने पहिल्या दोन सत्रांमध्ये दोन गोल करत सामन्याची दमदार सुरुवात केली. भारताकडून मनदीप सिंगने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर दोन मिनिटांनी अक्षदीप सिंगने दुसरा गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली.
Web Title: Hockey World Cup 2018: India's 5-0 win over South Africa begins
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.