Hockey World Cup 2018: The Indian team ready to end the 43-year drought of World Cup | Hockey World Cup 2018 : वर्ल्ड कप जेतेपदाचा 43 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज
Hockey World Cup 2018 : वर्ल्ड कप जेतेपदाचा 43 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज

ठळक मुद्देभारतीय पुरुष हॉकी संघाने आजपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज1975 नंतर पहिल्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी भारत प्रयत्नशीलभारताचा पहिला मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघाने आजपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. युवा खेळाडूंनी भरलेल्या या संघाला भारतात होणाऱ्या पुरुष विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने 1975 मध्ये अखेरचा विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अव्वल चार संघांमध्येही स्थान पटकावण्यात भारताला अपयश आले. 1982 आणि 2010 मध्ये भारताला या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला होता, परंतु त्याहीवेळेला आपण अपयशी ठरलो. भारताच्या खात्यात 8 ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा समावेश आहे, परंतु त्यांनी एकदाच विश्वचषक जिंकता आलेला आहे. 1975 च्या स्पर्धेत त्यांनी पाकिस्तानला 2-1 असे नमवून जेतेपद पटकावले होते.भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताला 'C' गटात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्यासमोर बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.  


या गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघांना क्रॉसओव्हर राऊंडमध्ये खेळाले लागेल.  


भारतीय संघाचे वेळापत्रक
28 नोव्हेंबरः भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( सायंकाळी 7 वाजता)
2 डिसेंबरः भारत विरुद्ध बेल्जियम ( सायंकाळी 7 वाजता)
8 डिसेंबरः भारत विरुद्ध कॅनडा ( सायंकाळी 7 वाजता) 


भारतीय संघ
पी. आर. श्रीजेश, कृष्णा पाठक, हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरुण कुमार, कोठाजीत सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेनसाना सिंग, निलकांत शर्मा, हार्दिक सिंग, सुमित, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित उपाध्ये आणि सिमरनजीत सिंग. 
 

थेट प्रक्षेपण
स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार अॅप, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्ही 


Web Title: Hockey World Cup 2018: The Indian team ready to end the 43-year drought of World Cup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.