Hockey World Cup 2018: Hockey World Cup inaugurated with a spectacular celebration | Hockey World Cup 2018 : दिमाखदार सोहळ्याने हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन
Hockey World Cup 2018 : दिमाखदार सोहळ्याने हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन

ओडिशा, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये दिमाखदार सोहळ्याने हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन झाले. उद्घाटन सोहळ्यामध्ये माधुरी दिक्षीत, शाहरुख खान यांसह काही बॉलीवूडच्या कलाकारांनी आपल्या अदाकारीने हा सोहळा अविस्मरणीय केला.

उद्घाटन सोहळ्यातील एक सुंदर दृश्य

बॉलीवूडचा किंग शाहरुख खानने केली दिमाखात एंट्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा 

ड्रोनच्या सहाय्याने या सोहळ्यात केलेली अदाकारी पाहायला हवी 

 

माधुरीने आपल्या कलाविष्काराने साऱ्यांना घायाळ केलेहॉकी वर्ल्डकपमध्ये एकूण 16 संघांचा समावेश आहे. हॉकी वर्ल्डकपमध्ये उद्यापासून सुरु होणारे सामने 16 डिसेंबरपर्यंत  खेळविले जाणार आहेत. 16 संघांचे चार ग्रुप तयार करण्यात आले  आहे. भारतीय संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश आहे, तर पाकिस्तान संघाचा डी ग्रुपमध्ये समावेश आहे. हॉकी वर्ल्डकपमध्ये 28 नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचे नेतृत्व खेळाडू मनप्रित सिंग करणार आहे. 


  

English summary :
Odisha, Men's Hockey World Cup 2018: Hockey World Cup Opening Ceremony held at the Kalinga International Hockey Stadium. In the opening ceremony, Madhuri Dixit, Shahrukh Khan and some Bollywood actors made this celebration unforgettable by their performances. 16 teams participated in the Hockey World Cup.


Web Title: Hockey World Cup 2018: Hockey World Cup inaugurated with a spectacular celebration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.