लक्ष्य आॅलिम्पिक पात्रतेचे नव्हे; तर पदकाचे असावे - हॉकीपटू संदीपसिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:53 AM2018-09-05T00:53:12+5:302018-09-05T00:53:23+5:30

भारतीय हॉकी संघाने २०२० साठी आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याचे नव्हे, तर आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे ध्येय ठेवायला पाहिजे, असे मत भारताचा अनुभवी ड्रॅग फ्लिकर संदीपसिंग याने मंगळवारी पुण्यात व्यक्त केले.

The goal is not to the Olympic qualification; If there is a medal - hockey player Sandeep Singh | लक्ष्य आॅलिम्पिक पात्रतेचे नव्हे; तर पदकाचे असावे - हॉकीपटू संदीपसिंग

लक्ष्य आॅलिम्पिक पात्रतेचे नव्हे; तर पदकाचे असावे - हॉकीपटू संदीपसिंग

googlenewsNext

पुणे : भारतीय हॉकी संघाने २०२० साठी आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याचे नव्हे, तर आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे ध्येय ठेवायला पाहिजे, असे मत भारताचा अनुभवी ड्रॅग फ्लिकर संदीपसिंग याने मंगळवारी पुण्यात व्यक्त केले.
एका कार्यक्रमात ‘लोकमत’सह संवाद साधताना संदीप म्हणाला, ‘खरे तर २०१४ प्रमाणे यंदाही आपण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. यात आपण कुठे कमी पडलो? योजना कुठे चुकल्या, याबाबत प्रशिक्षक व व्यवस्थापनाने कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारताने आॅलिम्पिक, विश्वचषकसारख्या महत्वाच्या स्पर्धांची केवळ पात्रता मिळविण्याचे नव्हे, तर पदक जिंकण्याचे ध्येय ठेवून योजना आखायला हवी. योजनाबद्ध सांघिक खेळावर भर दिल्यास हे यश मिळविणे शक्य आहे.’ 

Web Title: The goal is not to the Olympic qualification; If there is a medal - hockey player Sandeep Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी