Can read the action against Sreejesh, played with Kohli and Dhoni | श्रीजेशवरील कारवाई वाचू शकते, कोहली, धोनीसह खेळला होता सामना

भुवनेश्वर : विराट कोहलीच्या चॅरिटी फुटबॉल सामन्यात खेळण्याच्या निर्णयाने पीआर श्रीजेशवर मोठी टीका करण्यात आली. मात्र, भारताचा हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशचा हा निर्णय त्याला शिस्तभंगाच्या कारवाईपासून वाचवू शकतो. भारतीय संघाचा कर्णधार असलेला श्रीजेश आॅक्टोबरमध्ये मुंबईत ‘सेलिब्रिटी क्लासिको’मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात देशातील खेळाडू आणि बॉलिवूडस्टार सहभागी झाले होते.
यामध्ये भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीचासुद्धा समावेश होता. यादरम्यान तो ब्रेकवर होता. मात्र, तो गंभीर दुखापतीतून सावरत होता, ही गोष्ट त्याच्याविरुद्ध ठरली आहे. संघ व्यवस्थापनास त्याचे हे खेळणे पसंत आले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर कारवाईचे संकेतही दिले होते. मात्र, तो या कारवाईपासून वाचू शकतो; कारण हॉकी इंडियाने त्याच्याविरुद्ध अजूनही शिस्तभंगाची कारवाई केलेली
नाही. हॉकी इंडियाचे मुख्य कार्यकारी एलिना नोरमॅन हे शिस्तभंग समितीचे सदस्य आहेत.
यासंदर्भात ते म्हणाले, की आम्ही आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्या आम्ही हॉकी विश्व लीगमध्ये व्यस्त आहोत. शिस्तभंग समितीची बैठक बोलाविणार आहोत. त्यात चर्चा होईल.