अझलान शाह हॉकी; भारताला आयर्लंडविरुद्ध मोठ्या विजयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 2:21am

भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे.

इपोह - भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारताने काल मलेशियावर ५-१ ने विजय साजरा केला होता. त्याआधी आॅलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाने भारताला ३-२ ने आणि विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाने ४-२ ने नमविले होते. इंग्लंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. आॅस्ट्रेलिया चार सामन्यात चारही विजयासह अंतिम फेरीत दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था) भारताला आयर्लंडवर मोठ्या फरकाने विजय साजरा करावा लागेल; शिवाय आॅस्ट्रेलियाने अर्जेंटिनाला हरवावे आणि इंग्लंड-मलेशिया हा सामना बरोबरीत सुटावा, यावर भारताची पुढील वाटचाल विसंबून असेल. यंदा राष्टÑकुल आणि आशियाडसह चार मोठ्या स्पर्धांचे आयोजन आहे. यामुळे भारताने अनुभवी सरदारसिंग याच्या नेतृत्वात युवा संघ उतरविला आहे. मुख्य कोच शोर्ड मारिन मोठ्या स्पर्धांपूर्वी अनेक खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहेत. आयर्लंडवगळता अन्य चार संघांना अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची बरोबरीची संधी आहे. आॅस्ट्रेलियाचे १२, अर्जेंटिनाचे सात, मलेशियाचे सहा, इंग्लंड पाच आणि भारताचे चार गुण आहेत. आयर्लंड संघ चारही सामन्यात पराभूत झाला.

संबंधित

भारत-पाक लढतीत मानसिकता महत्त्वाची ठरणार
Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले
अंबाती रायुडू घेतो धोनीकडून मार्गदर्शन
पेट्रोल आणखी महागणार
‘ऋषभला यष्टिरक्षण चांगले करण्याची गरज’

हॉकी कडून आणखी

Asian Games 2018: shocking... भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय
Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाने केलेला दमदार गोल... पाहा हा व्हिडीओ
Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय
Asian Games 2018: जकार्तामध्ये इतिहास घडवायला आलो आहोत; हॉकी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचा निर्धार
Asian Game 2018 : 32 वर्षीय सरदार सिंग विराट कोहलीपेक्षा फिट!

आणखी वाचा