वन्य प्राण्यांनाही टँकरच्या पाण्याचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:46 PM2018-05-26T23:46:23+5:302018-05-26T23:46:23+5:30

सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.

 Wild animals also support tanker water | वन्य प्राण्यांनाही टँकरच्या पाण्याचा सहारा

वन्य प्राण्यांनाही टँकरच्या पाण्याचा सहारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.
सध्या वन विभागातील वृक्षतोड तर कधी वनव्यामुळे झाडे भुईसपाट झालीे आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास संपुष्टात तर आलाच आहे, त्याहून गंभीर म्हणजे प्राण तापत्या उन्हात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना अनेकदा मृत्यूमुखीही पडण्याची भीती आहे. त्यामुळे वन विभागाच्या वतीने ऐन उन्हाळ्यासाठी बनविलेल्या ३१ कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात २५ हजार ४७५ हेक्टर वनक्षेत्र असून, त्यामध्ये विविध जातीचे १ हजार ३४९ प्रकारचे प्राण्यांचा अधिवास आहे. तर जंगलात नैसर्गिक १४४ पाणवठे आहेत. मात्र पावसाळ्याचे दोन ते तीन महिने सोडले तर इतर महिने मात्र प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती केल्याशिवाय पर्यायच नाही. उन्हाळ्यात तर भयंकर स्थिती होते. पाण्याच्या शोधात निघालेले प्राणी अनेकदा वाहनाला धडकत आहेत, तर कुठे विहिरीत पडत आहेत. ही भटकंती थांबावी म्हणून वन विभागाने याही वर्षी टँकरद्वारे पानवठ्यात पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बारमाही पाणी राहणारे ८ तलाव, ८ धरणे आहेत. वन तळे २ अणि पाणवठे व इतर ८ ठिकाणी वर्षभर पाणी राहते. तर हंगामी पाणीसाठ्याची संख्या जास्त आहे. हंगामी वनतळ्यांची संख्या १४० असून, माती नाला बांध ६३ आणि सिमेंट नाला बांध १७ असे एकूण ३१ पाणवठ्यांची संख्या आहे. आजघडिला सर्वच पाणवठे कोरडेठाक असल्यामुळे शासकीय टँकरद्वारे या पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्वच पाणवठ्यात पाणी सोडण्याठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. पाणी सोडल्यानंतर त्याची छायाचित्रे दिलेल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करण्याच्या सूचना वनविभागाडून दिल्या आहेत. वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वनविभागाकडून होत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दरवर्षी कायम असल्याने वन्यप्राण्यांसाठीही वेगळे उपाय करावे लगात आहेत. तर उन्हामुळे झालेल्या पानगळीचाही फटका वन्यप्राण्यांना बसत आहे. मात्र वन विभागाकडून पाणवठ्यात पाणी सोडले जात असल्याने मानवी वस्त्याकडे वन्यप्राण्यांची धाव कमी होण्यास मदत झाली आहे.
भेडकी ६, चितळ- हरीण ८१, निलगाय- रोही ६२७, वानर ९५, रानकुत्रा ३०, रानडुक्कर ३२३, रानमांजर ६, तडस ३, मोर १२७, काळविट २१, ससा व इतर ३० असे १ हजार ३४९ वन्य प्राण्यांची बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी गणना झाल्याची नोंंद वन विभागाकडे आहे. यात अजूनही वाढ असण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपुर्वी वन्य प्राणी पाण्यासाठी शहर किंवा गावाकडे, मानवी वस्तीकडे धाव घेत होते. मात्र पाणठ्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वन्य प्राण्यांची धाव थांबली आहे. तसेच प्राण्यांच्या अपघाताचेही प्रमाण घटले आहे.
सध्या तापमान जास्त असल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वनविभागातर्फे पाणवठ्यात नियमित टँकरद्वारे पाणी सोडले जात असल्याचे वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.

Web Title:  Wild animals also support tanker water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.