जोरदार पावसामुळे कयाधूला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:11 AM2018-06-24T01:11:32+5:302018-06-24T01:11:50+5:30

शहर व परिसरात २२ जूनच्या मध्यरात्री दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे.

 Why flood due to heavy rains | जोरदार पावसामुळे कयाधूला पूर

जोरदार पावसामुळे कयाधूला पूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : शहर व परिसरात २२ जूनच्या मध्यरात्री दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे.
तालुक्यात एकाच रात्री १५० मी.मी. पाऊस पडला आहे. छोटे नाले भरून पाणी वाहिले आहे. शेतात पाणीच पाणी साचले आहे. शहरातील बुडखी नदीही तुडूंब भरून वाहिली आहे. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मृगातच चांगला पाऊस पडल्याने ४० ते ५० टक्के पेरण्या झाल्या होत्या. पावसाचा १५ ते २० दिवसांचा खंड पडल्याने कोवळी पिके करपू लागली. शेतकºयांना ही कोवळी पिके वाचविण्यात कसरत करावी लागली. काही कोवळी पिके करपू लागली. शेतकºयांना ही कोवळी पिके करपूनही गेली. काही शेतकºयांचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यांना आर्थिक फटका बसला आहे. येत्या ८ ते १० दिवसात १०० टक्के पेरण्या पुर्ण होणार आहे. रात्रीच्या जोरदार पावसामुळे काही शेतात अजूनही वळाणी झाली नाही. काही शेतकरी उरलेली पेरणी उरकून घेत आहेत. पडलेल्या दमदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
२३ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वातावरणात उकाडा जाणवत होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीत गुंतले होते. तालुक्यातून जाणारी कयाधू नदीला पुर आला आहे.

Web Title:  Why flood due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.