वसमत - नांदेड रोडवरील अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:14 AM2019-03-23T00:14:05+5:302019-03-23T00:14:20+5:30

वसमत - नांदेड रोडवरील वसमतपासून दीड किमी अंतरावर असलेल्या कन्हेरगाव पाटीजवळ दोन दुचाकीची समोरा-समोर धडक बसून या अपघातात एक जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी तर तिसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

 Wasmat - One killed in an accident on Nanded road | वसमत - नांदेड रोडवरील अपघातात एक ठार

वसमत - नांदेड रोडवरील अपघातात एक ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत: वसमत - नांदेड रोडवरील वसमतपासून दीड किमी अंतरावर असलेल्या कन्हेरगाव पाटीजवळ दोन दुचाकीची समोरा-समोर धडक बसून या अपघातात एक जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी तर तिसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
२२ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वसमत येथून दीड किमी अंतरावर नांदेड रोडवरील कन्हेरगाव पाटीवर हा आपघात झाला आहे. दुचाकी क्र. एम.एच. २६ ए.एल. ९६३ तसेच गाडी क्र. एम.एच. २६ ए.व्ही. ३८४० या दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात संतोष एकनाथ कºहाळे (३०, रा.परजना ता. वसमत) हा तरूण जागीच ठार झाला आहे. तसेच पिराजी प्रयाजी कºहाळे (५० रा.परजना ता.वसमत) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. नागेश बालाजी तुरेराव (२६) हा देखील जखमी झाला असून उपचारासाठी त्यास नांदेड येथे हलविले आहे. मयत कºहाळे यांचे शवविच्छेदन केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. मयताच्या कुटुंबियांनी प्रेत अंत्यसंस्कारांसाठी परजना येथे नेले.

Web Title:  Wasmat - One killed in an accident on Nanded road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.