येत्या तीन दिवसांत वॉर्डचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:33 AM2018-04-24T00:33:49+5:302018-04-24T00:33:49+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर बनविलेल्या वॉर्डाची साफसफाई सुरु असून बुधवारपासून १ आणि ३ नंबर वार्ड तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने अनेक रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होण्यास मदत मिळणार आहे.

 Ward transfers in the next three days | येत्या तीन दिवसांत वॉर्डचे स्थलांतर

येत्या तीन दिवसांत वॉर्डचे स्थलांतर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर बनविलेल्या वॉर्डाची साफसफाई सुरु असून बुधवारपासून १ आणि ३ नंबर वार्ड तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने अनेक रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होण्यास मदत मिळणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसºया मजल्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु होते. शिवाय, या ठिकाणी औषधीही रुग्णांना बाहेरुन आणावी लागत आहे. यासह अनेक अडचणींचा करावा लागणारा सामना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालयाची झाडाझडतीच घेतली होती. यात आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी ठरावीक कालावधीही ठरवून दिला होता. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे रेंगाळत चाललेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे काम गतीने करण्यासाठी खडसावले होते. एवढेच काय तर शहर पोलीस ठाण्यात काम पूर्ण करण्याची तारीखही लिहून देण्यास सांगितले होते. त्यामुळे का होईना पण इमारतीचे जवळपास काम ९० टक्के झाले असल्याने आता रुग्णालय २०० बेडचे होणार आहे. रुग्णालयातील इतर प्रश्न सुटले असले तरीही अजून औषधीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरुन औषधी आणण्यासाठी धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. मात्र वर्षानुवर्षाचा खाटेचा प्रश्न तरी सुटणार आहे. एका- एका खाटेवर दोन- दोन रुग्णांना उपचार घेण्याची वेळ तूर्तास टळण्यास मदत होणार आहे. प्रारंभी १ व ३ वॉर्ड हलविला जाणार आहे. तर डॉक्टरांचाही तपासणी कक्ष दुसºयाच मजल्यावर बनविण्यात आला आहे. मात्र येथे अजून लिफ्टची व्यवस्थाच करण्यात आलेली नसल्याने अपंग रुग्णांना पायºया चढता - चढता नाकीनऊ येण्याची शक्यता आहे. शिवाय औषधीसाठीही खालीच धाव घ्यावी लागणार आहे.
समस्यांवर लक्ष : डायलिसिस वॉर्डही हलणार
विविध समस्यांने जिल्हा सामान्य रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घातले असल्याने, यंत्रणा समस्या सोडविण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र अधून - मधून काही केल्या येथील पाणी समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना
पाण्यासाठी हॉटेलचा आधार घ्यावा लागतोे. तेथेही फुकट पाणी नसून काही पदार्थ खरेदी केले तर पाणी मिळते. याकडेही एकदा जिल्हाधिकाºयांनी लक्ष दिले तर तोदेखील प्रश्न मार्गी लागू शकतो, असे येथील पाण्यासाठी हैराण झालेले रुग्ण सांगत आहेत.
रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याचा प्रयत्न रुग्णालयातर्फे सुरु आहे. तर पाण्याच्या समस्येकडे स्वत: लक्ष घालत असल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक मंगेश टेहरे यांनी सांगितले.

Web Title:  Ward transfers in the next three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.